Kadamba Bus Accident: गोव्यात बुधवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. सकाळपासूनच येथे जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच सकाळी एका कदंबा बसला (क्रमांक - GA 03 X 0490) भरपावसात अपघात झाला.
भरधाव असलेल्या कदंबा बसवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस दोन्ही रस्त्यांमध्ये असलेल्या लोखंडी रेलिंगवर जाऊन धडकली.
सकाळी 10 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही बस वास्कोच्या दिशेने चालली होती. तेव्हा हा अपघात झाला. बसची रेलिंगला बसलेली ही धडक इतकी जोरात होती की, बसचा पुढील बाजूचा पत्रा कापला जाऊन रेलिंग बसमध्ये घुसले आहे. सुदैवानेच त्यानंतर बस थांबली नाहीतर आणखी मोठा अपघात होऊ शकला असता.
दरम्यान, या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे. या अपघाताची माहिती मिळताच संबंधित प्रशासन यंत्रणेतील लोक घटनास्थळी दाखल झाले.
ही बस कुठ्ठाळी-बांबोळी-पणजी या मार्गावर तसेच वास्को ते शिरढोण या मार्गावर धावत होती. दरम्यान, पावसातच क्रेन लावून ही बस हटविण्याचे काम सुरू झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.