Goa Sports Organizations: राज्यातील क्रीडा संघटना आर्थिक संकटात; गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून मिळणारे अनुदान दीर्घकाळ प्रलंबित

Goa sports organizations financial crisis: राज्यातील विविध क्रीडा संघटना आर्थिक संकटात आहेत. याचे कारण म्हणजे गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून त्यांना मिळणारे अनुदान दीर्घ काळापासून प्रलंबित आहे.
Goa Sports Organizations
Goa Sports OrganizationsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील विविध क्रीडा संघटना आर्थिक संकटात आहेत. याचे कारण म्हणजे गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून त्यांना मिळणारे अनुदान दीर्घ काळापासून प्रलंबित आहे. यासंदर्भात गोवा ऑलिंपिक संघटना (जीओए) आणि वेगवेगळ्या खेळांच्या राज्यस्तरीय संघटनांनी बुधवारी प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर करून लक्ष वेधले.

गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस, जीओए खजिनदार जयेश नाईक, हॉकी संघटनेच्या सचिव फॅरेल फुर्तादो, गोवा राज्य टेनिस संघटनेचे अध्यक्ष सचिन दुकळे, गोवा जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश ठाकूर, गोवा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष योगेश ठाकूर, गोवा ट्रायथलॉन असोसिएशनच्या सचिव निशा मडगावकर आदींचा समावेश होता.

Goa Sports Organizations
Goa Murder Case: श्रवणचा मृत्यू गळा दाबल्याने आणि मारहाणीमुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट; खूनाचा कट कुणी रचला?

शिष्टमंडळाने राज्यातील क्रीडा संघटना आणि खेळाडूंच्या कामकाजावर आणि विकासावर परिणाम करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. यावेळी संघटनांना सतावणारी चिंता, तसेच अपेक्षांचे तपशीलवार निवेदन गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकांना सादर करण्यात आले आणि त्वरित निराकरणाची आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Goa Sports Organizations
Goa Politics: खरी कुजबुज, हे गाजर कधीपर्यंत दाखवणार?

प्रमुख मागण्या

  • दीर्घकाळ प्रलंबित क्रीडा अनुदानाचे वितरण

  • संघ निवड चाचणीसाठी भाडेमुक्त सुविधांची तरतूद

  • प्रशिक्षकांच्या नियुक्त्या

  • मानांकन स्पर्धांना पाठबळ

  • अनुदान रकमेत सुधारणा करणे

  • राष्ट्रीय स्पर्धा सुविधा उपलब्ध करणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com