सबज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत तुषारचे स्वप्नवत विजेतेपद

श्रेष्ठा, तन्वी, अभिनव यांचेही वर्चस्व
Sub-Junior Badminton Tournament
Sub-Junior Badminton TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कर्नाटकच्या अकराव्या मानांकित तुषार सुवीर याने अखिल भारतीय सबज्युनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील स्वप्नवत धडाका कायम राखताना 17 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत विजेतेपद मिळविले. नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याने महाराष्ट्राच्या तृतीय मानांकित प्रणय शेट्टीगर याचा पाडाव केला.

तुषारने अगोदरच्या लढतीत चौथा मानांकित उत्तराखंडचा ध्रुव नेगी, नंतर अव्वल मानांकित राजस्थानचा संस्कार सारस्वत याला हरविले होते. शनिवारी अंतिम लढतीत त्याने जोमदार फॉर्म कायम राखताना प्रणय याच्यावर 48 मिनिटांत 21-18, 23-21 अशी मात केली.

Sub-Junior Badminton Tournament
Vijai Sardesai : सरकारच्या मनमानी कारभारामुळे गोव्यातील अर्थव्यवस्था श्रीलंकेसारखी कोसळण्याची भीती

अन्य अंतिम लढतीत 15 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत अभिनव गर्ग याने, तर मुलींत तन्वी रेड्डी अंदलुरी हिने, तर 17 वर्षांखालील मुलींत श्रेष्ठा रेड्डी हिने विजेतेपद प्राप्त केले.

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर, सचिव संदीप हेबळे, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे निरीक्षक के. एन. जैसवाल, तांत्रिक सल्लागार विनायक कामत, उत्तर गोवा जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, स्पर्धेचे मुख्य रेफरी विवेक सराफ यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

तन्वीचा अव्वल खेळाडूस धक्का

स्पर्धेत नववे मानांकन असलेल्या कर्नाटकच्या अभिनवने 15 वर्षांखालील मुलांत द्वितीय मानांकित राज्यसहकारी प्रतीक कौंडिल्य याला 58 मिनिटांत तीन गेममध्ये 20-22, 24-22, 21-18 असे हरविले.

15 वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित नैशा कौर भटोये हिला पराभवाचा धक्का बसला. पाचव्या मानांकित तेलंगणच्या तन्वी रेड्डी हिने तिला 39 मिनिटांत 21-17, 21-16 फरकाने हरविले. 17 वर्षांखालील मुलींत तेलंगणच्या श्रेष्ठा हिने 58 मिनिटांत सातव्या मानांकित हरियानाच्या जिया रावत हिच्यावर 21-14, 16-21, 21-17 अशी मात केली.

दुहेरीतील अंतिम निकाल

15 वर्षांखालील मुलगे : जे. शौर्य किरण व टी. टी. ज्ञान दत्तू (तेलंगण) वि. वि. बियॉर्न जैसन व पी. व्ही. आतिश श्रीनिवास (केरळ) 21-19, 21-14.

15 वर्षांखालील मुली : अनुष्का गोलाश व दृष्टी वालदिया (दिल्ली) वि. वि. मेधावी नगर व बरुनी पर्शवाल (हरियाना) 21-17, 21-12.

15 वर्षांखालील मिश्री : सूर्याक्ष रावत व आन्या बिश्त (उत्तराखंड) वि. वि. महंमद अली मीर (गुजरात) व तन्वी शर्मा (पंजाब) 21-17, 13-21, 21-12.

17 वर्षांखालील मुलगे : देव अय्यप्पन व धिरेन अय्यप्पन (तमिळनाडू) वि. वि. अर्श महंमद (उत्तर प्रदेश) व संस्कार सारस्वक (राजस्थान) 10-21, 21-18, 21-16.

17 वर्षांखालील मुली : एन. श्रीनिधी व आर. प्रवंधिका (तमिळनाडू) वि. वि. तारिणी सुरी व श्रवंती वळेकर (महाराष्ट्र) 21-13, 21-15.

17 वर्षांखालील मिश्र : आर. अरुलमुरुगन व एन. श्रीनिधी (तमिळनाडू) वि. वि. प्रणव शेट्टीगर (महाराष्ट्र) व एल्लोरा कोनेर (तेलंगण) 16-21, 21-16, 21-18.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com