T20 Cricket: गोव्याच्या महिलांना माफक लक्ष्य ठरले अवघड; अवघ्या 15 धावांनी हार

केरळविरुद्ध 15 धावांनी पराभव, दुसरा सामना गमावला
T20 Cricket
T20 CricketDainik Gomantak
Published on
Updated on

T20 Cricket: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत केरळला माफक धावसंख्येत रोखल्याचे समाधान गोव्याला जास्त काळ लाभले नाही. कारण 129 धावांच्या आव्हानासमोर त्यांना 15 धावांनी हार पत्करावी लागली.

स्पर्धेच्या ड गटातील सामना शुक्रवारी नागपूर येथील लेडी अमृतबाई डागा कॉलेज मैदानावर झाला. गोव्याच्या महिलांना सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

गुरुवारी त्यांना हिमाचल प्रदेशने 26 धावांनी हरविले होते. केरळला 9 बाद 128 धावांत रोखल्यानंतर गोव्याचा डाव 19.2 षटकांत 113 धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक

केरळ महिला ः २० षटकांत ९ बाद १२८ (आय. व्ही. दृष्या ३२, जिन्सी जॉर्ज २६, एस. संजना ३९, शिखा पांडे ४-०-१७-२, निकिता मळीक १-०-१४-०, पूर्वा भाईडकर २-०-१९-१, तरन्नूम पठाण ४-०-१६-२, प्रियांका कौशल ४-०-२४-०, सुनंदा येत्रेकर ४-०-२३-४, तनया नाईक १-०-१४-०) वि. वि. गोवा महिला ः १९.२ षटकांत सर्वबाद ११३ (पूर्वजा वेर्लेकर २२, तरन्नूम पठाण १, संजुला नाईक ४, शिखा पांडे १५, सुनंदा येत्रेकर २१, विनवी गुरव ०, तेजस्विनी दुर्गड २४, पूर्वा भाईडकर २, निकिता मळीक नाबाद १२, तनया नाईक २, प्रियांका कौशल ७, कीर्ती जेम्स २-९, मिन्नू मणी २-२३, एस. संजना २-३१, सीएमसी नलजा २-१९).

T20 Cricket
Indian Super League: एफसी गोवासमोर ईस्ट बंगालचे तगडे आव्हान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com