Indian Super League: एफसी गोवासमोर ईस्ट बंगालचे तगडे आव्हान

आयएसएल फुटबॉल: भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर आज सामना
Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak

Indian Super League कार्ल्स कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळ केलेला आहे. साहजिकच भुवनेश्वर येथील तटस्थ कलिंगा स्टेडियमवर त्यांच्याविरुद्ध शनिवारी (ता. 21) एफसी गोवासमोर तगडे आव्हान असेल.

कोलकात्यातील दुर्गापूजा उत्सवानिमित्त सामना भुवनेश्वरला हलविण्यात आला आहे. घरच्या मैदानावर फातोर्ड्यात पंजाब एफसीवर 1-0 आणि ओडिशा एफसीवर 3-2 असा विजय मिळविल्यानंतर एफसी गोवा संघ मोसमात प्रथमच अवे मैदानावर खेळत आहे.

त्यांचे सध्या सहा गुण आहेत. ईस्ट बंगालचे तीन लढतीतून चार गुण आहेत. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत त्यांना बंगळूरने पराभवाचा धक्का दिला होता.

एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ ईस्ट बंगालला कमी लेखत नाहीत. ``त्यांच्यापाशी दर्जेदार खेळाडू आहेत, त्यापैकी हावी सिव्हेरियो, बोर्हा हेर्रेरा हे माझ्या मार्गदर्शनाखाली स्पेनमध्ये, तसेच हैदराबाद एफसी संघातून खेळलेले आहेत.

ते धोकादायक आहेत. त्यांच्या संघात अनुभवी खेळाडू असल्यामुळे आमच्यासाठी सामना निश्चितच कठीण आहे हे मी जाणून आहे. चांगला खेळ करणारा संघ निश्चितच जिंकणार,`` असे मार्केझ यांनी शनिवारच्या लढतीविषयी सांगितले.

दृष्टिक्षेपात...

  • आयएसएल स्पर्धेत ६ लढती, एफसी गोवाचे ३, तर ईस्ट बंगालचा १ विजय, २ बरोबरी

  • २०२२-२३ मोसमात एफसी गोवा कोलकात्यात २-१, फातोर्ड्यात ४-२ फरकाने विजयी

  • एफसी गोवाचा सध्याचा फॉर्म ः विजय, विजय

  • ईस्ट बंगालचा सध्याचा फॉर्म ः बरोबरी, विजय, पराभव

Indian Super League
37th National Games: यजमान गोव्याला 4-1 फरकाने नमवत सुवर्णपदकासाठी महाराष्ट्र कर्नाटक आमनेसामने

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com