State Level Football Tournament: 'वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक' राज्यस्तरीय विजेते

17 वर्षांखालील फुटबॉल: ‘गार्डियन एंजल’विरुद्ध ॲशन वाझचा निर्णायक गोल
 Football Tournament
Football TournamentDainik Gomantak

State Level Football Tournament: सामन्याच्या अखेरच्या मिनिटास ॲशन वाझ याने नोंदविलेल्या शानदार गोलमुळे कुजिरा येथील वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाने 17 वर्षांखालील मुलांच्या सुब्रतो मुखर्जी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. चुरशीच्या अंतिम लढतीत त्यांनी कुडचडे येथील गार्डियन एंजल उच्च माध्यमिक विद्यालयाला 2-1 फरकाने हरविले.

क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना सांताक्रूझ येथील मैदानावर झाला. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटास नॅश फर्नांडिस याने केलेल्या गोलमुळे वसंतराव धेंपो उच्च माध्यमिकने आघाडी प्राप्त केली.

 Football Tournament
Water Issue In Goa: काणकोणात 'हर घर जल'चे तीन तेरा, सरकारी ऑफिसांचीच 'अशी' अवस्था तर सर्वसामान्यांची काय गत, वाचा..

मात्र गार्डियन एंजल उच्च माध्यमिकने मुसंडी मारताना 15 व्या मिनिटास महंमद रेहान याने केलेल्या गोलमुळे बरोबरी साधली. विश्रांतीला दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत होते. नंतर अखेरच्या मिनिटास ॲशन याने केलेल्या गोलमुळे धेंपो क्लबला आघाडी मिळाली व ती अखेरीस निर्णायक ठरली.

राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्तर जिल्हा, तर गार्डियन एंजल उच्च माध्यमिकने दक्षिण जिल्हा विभागीय विजेतेपद पटकावले होते.

बक्षीस वितरण कार्यक्रमास गार्डियन एंजल उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य फादर वॉल्टर मिरांडा, फादर जॉन्सन गोन्साल्विस, क्रीडा खात्याचे राज्यस्तरीय क्रीडा आयोजक अनंत सावळ यांची उपस्थिती होती.

 Football Tournament
Professional League Football Tournament: गार्डियन एंजलच्या विजयात ज्योएलचा गोल

सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद

वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी 17 वर्षांखालील मुलांच्या गटातील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम साधला. या कामगिरीमुळे ते आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहेत.

ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये खेळली जाईल. तालुका ते राज्यस्तरीय पातळीवर सातत्यपूर्ण खेळ करत ॲशन वाझ व नॅश फर्नांडिस यांनी धेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com