Star Contender Table Tennis: नित्या मणीची इंग्लंडच्या टिन-टिन हो वर मात; नित्या मुख्य फेरीसाठी पात्र

Star Contender Table Tennis: इंग्लंडच्या टिन-टिन हो हिच्यावर मात
Star Contender Table Tennis
Star Contender Table TennisDainik Gomantak
Published on
Updated on

Star Contender Table Tennis: चुरशीच्या लढतीत इंग्लंडच्या टिन-टिन हो हिच्यावर मात करून चेन्नई येथील नित्या मणी हिने डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर २०२४ टेबल टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रता मिळविली.

पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या महिलांच्या पात्रता फेरीतील शेवटच्या लढतीत नित्या हिने इंग्लंडच्या खेळाडूला ३-२ (११-७, ६-११, ५-११, ११-९, ११-७) असे निसटते नमविले.

Star Contender Table Tennis
Vedanta Bicholim Mines: 'कामावर घेत नसाल, तर आमच्या शेती परत द्या'- शेतकऱ्यांचा एल्गार

स्पर्धेच्या मुख्य फेरीला गुरुवारपासून सुरवात होत आहे. महिला पात्रता फेरीत भारताच्या अहयिका मुखर्जी, दिया चितळे, सुतिर्था मुखर्जी यांची वाटचाल खंडित झाली. अहयिका हिला तुर्किएच्या सिबेल अल्टिन्काया हिने १-३ (११-५, ९-११, ६-११, ६-११) हरविले.

स्पेनच्या सोफिया झँग हिने दिया हिच्यावर ३-१ (११-५, ६-११, १४-१२, ११-०) अशी मात केली, तर सुतिर्था हिला हान्ना रियू हिच्याकडून १-३ (८-११, ७-११, १२-१०, ४-११) असा पराभव पत्करावा लागला.

पुरुष एकेरीत फ्रान्सच्या व्हिन्सेंट पिकाँ याच्याकडून भारताच्या ज्ञानशेखरन साथियन याला १-३ (८-११, ७-११, १२-१०, ४-११) असा पराभव पत्करावा लागला. मानव ठक्करला सेनेगलच्या इब्राहिमा दियाव याने ३-० (१२-१०, ११-६, ११-७) असे नमविले.

पुरुष दुहेरीत जीत चंद्रा व पायस जैन यांनी, तर महिला दुहेरीत सायली वाणी व तनीषा कोटेचा यांनी मुख्य फेरी गाठली. मिश्र दुहेरीत मानुष शाह व दिया चितळे यांनी आगेकूच राखली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court FAR Dues
Ireland Cricket Head Coach Heinrich Malan Resigns
Dicholi Water Supply Issue
Suryakumar Yadav T20 Captaincy Controversy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com