Football Tournament
Football TournamentDainik Gomantak

National Junior Football Tournament: गोव्याच्या मुलींचा राष्ट्रीय फुटबॉलमध्ये डंका, आंध्र प्रदेशवर 1-0 फरकाने मात

ज्युनियर स्पर्धा: पर्ल हिच्या गोलमुळे अंतिम लढतीत आंध्रवर मात
Published on

National Junior Football Tournament अप्रतिम फॉर्ममध्ये असलेल्या पर्ल फर्नांडिस हिने सामन्याच्या पूर्वार्धात केलेल्या गोलच्या बळावर गोव्याच्या मुलींनी राष्ट्रीय ज्युनियर (17 वर्षांखालील) फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी आंध्र प्रदेशवर 1-0 फरकाने मात केली.

स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी राजस्थानमधील जोधपूर येथे झाला. गोव्याच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचललेल्या पर्ल हिने सामन्याच्या दहाव्या मिनिटास गोल केला, हाच गोल अखेरीस गोव्याला जेतेपद मिळवून देण्यास कारणीभूत ठरला.

स्पर्धेत गोव्याने एकही सामना गमावला नाही, तसेच एकही गोल स्वीकारला नाही. जोनाथन फालेरो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने स्पर्धेत एकूण १६ गोल नोंदविले, त्यापैकी १२ गोल पर्ल हिने एकटीने नोंदविले.

गोव्याने साखळी फेरीत उत्तराखंड (3-0), कर्नाटक (4-0), लडाख (5-0) या संघांना नमविले, नंतर आसामला 3-0 असे नमवून अंतिम फेरी गाठली आणि विजेतेपदाच्या लढतीत आंध्र प्रदेशलाही एका गोलने पराभूत केले.

दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय पातळीवर विजेतेपद मिळवलेल्या गोव्याच्या संघाचे गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.

Football Tournament
Goa Fire: कचरा शेडला आग, कोटीची हानी; कुळे-शिगाव पंचायतीतील घटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com