Goa Fire: कचरा शेडला आग, कोटीची हानी; कुळे-शिगाव पंचायतीतील घटना

सर्व यंत्रणा खाक, अज्ञाताविरोधात गुन्हा
Goa Fire
Goa FireDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fire अज्ञात व्यक्तीने कुळे शिगाव पंचायत क्षेत्रातीतील कचरा शेडला आग लावल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या आगीत कचरा वेगळा करणारी सर्व मशिन्स जळून खाक झाले असून या घटनेत जवळपास एक कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अज्ञाताविरोधात कुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सरपंच गोविंद शिगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 च्या सुमारास या कचरा शेडला आग लावली असावी. आगीचा भडका उडाल्यानंतर स्थानिक पंच आश्विनी नाईक देसाई यांनी आम्हाला याबाबत कळविले.

त्यानंतर लगेच कुडचडे व फोंडा अग्नीशामक दलाला कळविण्यात आले. अग्नीशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करीत ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मशिन्स जळालेली होती. शेडचे सर्व पत्रेही आगीत भस्मसात झाले.

आगीच्या ज्वालाने भिंतीला तडे गेले असून काही ठिकाणी भिंतीवरील सिमेंट पडलेले आहे. तसेच याठिकाणी भरून ठेवलेले ऑईल बॅरेलही जळाले.

शिरगावकर म्हणाले, की सोमवारी याचा रितसर पंचनामा करून या घटनेत किती नुकसान झाले, हे स्पष्ट होणार आहे. पूर्वी जे जीम होते त्यामध्ये प्लास्टिक कचरा (रिकाम्या बॉटल्स) ठेवला आहे. तोही जळाला आहे. कचरा शेडपासून हे जीम 50 मीटर अंतररावर आहे. या ठिकाणी सुद्धा आग लावण्यात आली आहे.

दरम्यान, कुळे शिगाव पंचायत सरपंच गोविंद शिगांवकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंचसदस्य आश्विनी नंदीश नाईक देसाई, बेनी आजावेदो, साईश नाईक, अनिकेत देसाई व सदानंद बांदेकर यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.

Goa Fire
Goa University: गोवा विद्यापीठात बहरला 'इच्छा पूर्ण करणारा वृक्ष'; जॉय ऑफ गिव्हिंगला मोठा प्रतिसाद

समाजकंटकाकडून प्रकार-

सर्व पंचायत मंडळ प्लास्टिक व कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. काही समाजकंटक मात्र या विरोधी असून ते सहकार्य करीत नाहीत. अशा लोकांनी हा प्रकार घडवून आणला असावा, असा आमचा संशय आहे. अ

अशा व्यक्तीना आम्ही सोडणार नाही. आम्ही या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस शक्य तो लवकर तपास करुन त्यांच्यावर कडक कारवाई करतील, असेही गोविंद शिगांवकर यांनी सांगितले.

Goa Fire
Bambolim News: गोमेकॉमध्ये 'क्यूबिक इन्फ्रा'तर्फे होणार मनोरुग्णालयाची उभारणी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com