Indian Super League Football: एफसी गोवासाठी चाहत्यांचे प्रोत्साहन निर्णायक

प्रशिक्षक मार्केझत: आयएसएलमधील ओडिशाविरुद्धच्या विजयानंतर प्रतिक्रिया
Manolo Marquez
Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने झुंजार विजयाची नोंद करताना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी ओडिशा एफसीला 3-2 असे निसटते हरविले. घरच्या मैदानावरील सलग दुसरा सामना जिंकल्यानंतर संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी यशाचे श्रेय चाहत्यांनाही दिले.

मोरोक्कन नोआ सदोईचे दोन गोल आणि ओडिशाच्या मुर्तदा फाल याचेही दोन गोल यामुळे निर्धारित 90 मिनिटांत सामना 2-2 असा गोलबरोबरीत होता.

जय गुप्ता याने डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर इंज्युरी टाईममध्ये गोलबरोबरीत कोंडी फुटली आणि एफसी गोवाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. संघाला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या पाठिराख्यांचा जल्लोष निर्णायक ठरला, असे मत मार्केझ यांनी व्यक्त केले.

मार्केझ म्हणाले, ‘‘सामन्यात पाठिराख्यांची उपस्थिती आणि त्यांचा जोश खूप महत्त्वाचा ठरला. त्या जोरावर खेळ उंचावण्यास मोलाची मदत झाली. एकंदरीत लागोपाठच्या दोन विजयी सामन्यांत चाहत्यांचे पाठबळ मौल्यवान ठरले.’’

गोल केलेले नोआ आणि जय यांनीच नव्हे, तर प्रत्येक खेळाडूने चोख भूमिका बजावला. विशेषतः उतरार्धात एक संघ म्हणून छान खेळ झाला.

वेगवान पासिंग झाले आणि त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवरील दबाव वाढला, असे सामन्याविषयी मार्केझ यांनी नमूद केले. एफसी गोवाची सामन्यातील सुरवात चांगली नव्हती, मात्र नंतर कामगिरी उंचावल्याचे त्यांनी मान्य केले.

Manolo Marquez
Pernem Zoning Plan: महत्वाची बातमी! जमीन रूपांतर आराखड्याच्या सूचना- हरकतींसाठी मुदत वाढवली

अजून खूप सामने बाकी

“ओडिशाविरुद्ध सुरवातीची 25 मिनिटे वगळता सांघिक कामगिरीवर मी खूष आहे. अजून खूप सामने बाकी आहेत. बरेच चढ-उतार पाहायचे आहेत. आम्ही मागील सामन्यात चुकीचा खेळ केला होता आणि आज आम्ही तुलनेत चांगले खेळलो.

आपल्याला सातत्य आवश्यक असले तरी नेहमी खेळ चांगला होईलच, असेही नाही,” असे मार्केझ म्हणाले. पूर्वार्धात एका गोलने पिछाडीवर राहिल्यानंतर त्याची चर्चा मध्यंतराला ड्रेसिंग रुममध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रँडनला तंदुरुस्तीची समस्या

ओडिशाविरुद्ध एफसी गोवाचा कर्णधार ब्रँडन फर्नांडिस याने छान खेळ केला. दोन वेळा त्याचे गोल करण्याचे प्रयत्न चुकले. मात्र दुखापतीमुळे 70 व्या मिनिटास त्याला मैदानाबाहेर बोलवावे लागले, अशी माहिती मार्केझ यांनी दिली.

“सामन्यापूर्वीच्या शेवटच्या सराव सत्रात ब्रँडनला काही समस्या आल्या. तरीही, तो खूप चांगला खेळला, पण नंतर मर्यादा आल्याने मैदानाबाहेर पडण्यास सांगितले. त्याच्या समस्ये नेमके कारण मला माहीत नाही,” असे मार्केझ म्हणाले.

Manolo Marquez
Bhoma Road Expansion: आंदोलन होणारच! बगलमार्गप्रश्नी भोमवासीय आक्रमक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com