Indian Super League: तुल्यबळ खेळ करण्याचे ध्येय; दोन्ही संघांसाठी विजयाचे पूर्ण तीन गुण महत्त्वाचे

Indian Super League: ओडिशा, एफसी गोवाची नजर अग्रस्थानावर
Manolo Marquez
Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेत एफसी गोवा संघाला शुक्रवारी (ता. ९) अवघड प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण क्षमतेने मैदानात उतरावे लागेल. त्यांनी तुल्यबळ खेळ करण्याचे ध्येय बाळगले आहे. सध्याचा चमकदार खेळ पाहता ओडिशा एफसीचे पारडे जड संभवते.

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी दोन्ही संघांसाठी विजयाचे पूर्ण तीन गुण महत्त्वाचे असतील.

अपेक्षित निकाल नोंदविल्यास ओडिशा एफसीचे सध्याचे अव्वल स्थान आणखीनच मजबूत होईल, दुसरीकडे एफसी गोवाने विजय प्राप्त केल्यास ते ओडिशा एफसीला गुणतक्त्यात गाठतील.

सध्या १४ सामन्यांतून ओडिशाचे ३० गुण असून ते पहिल्या स्थानी आहेत. एफसी गोवाने ११ लढतीतून २७ गुण प्राप्त केले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

स्पर्धेतील पहिले पाच संघ विजेतेपदासाठी दावेदार आहेत. प्रतिस्पर्धी मातब्बर आहेत. फुटबॉलमध्ये सातत्याने बदल घडत राहतात.

आमच्यादृष्टीने विचार केल्यास, आम्हाला स्वतःच्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण दुसऱ्या संघाला आम्ही नियंत्रित करू शकत नाही. सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत आमचा संघ तुल्यबळ राहील,` असे सांगत मानोलो यांनी पूर्ण गुण हेच उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

एफसी गोवा स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ असून पहिल्या टप्प्यात त्यांनी ओडिशाला नमविले होते. ओडिशाचा सेनेगलचा बचावपटू मोर्तदा फाल याचा एफसी गोवाला धोका असेल.

या ३६ वर्षीय उंचपुऱ्या खेळाडूने यंदा तीन गोल केले आहेत, त्यापैकी दोन एफसी गोवाविरुद्ध आहेत. हल्लीच्या काळात तो आपल्या जुन्या संघाविरुद्ध सेट पिसेसमध्ये नेहमीच परिणामकारक ठरला आहे.

Manolo Marquez
Margao Crime News: महिलेचे 8 तोळ्यांचे मंगळसूत्र पळवले; महिन्याभरातील दुसरी घटना

सध्या अतिशय चांगले फुटबॉल खेळणाऱ्या संघाला आम्ही सामोरे जात आहोत. काही महिन्यांपूर्वी त्यांना आमच्याविरुद्ध, तसेच केरळा ब्लास्टर्सविरुद्द लागोपाठ हार पत्करावी लागली होती. मात्र त्यानंतर ते स्पर्धेत अपराजित आहेत. आमच्यासाठी सामना कठीण असेल, त्याचवेळी त्यांच्यासाठीही लढत सोपी नसेल.`

- मानोलो मार्केझ, एफसी गोवाचे प्रशिक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com