Margao Crime News: महिलेचे 8 तोळ्यांचे मंगळसूत्र पळवले; महिन्याभरातील दुसरी घटना

Margao Crime News: आके येथे घडली घटना
Crime
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Crime News: आके मडगाव येथे बसची वाट पाहत थांबलेल्या संगीता गवकर या महिलेचे 8 तोळ्यांचे मंगळसूत्र पळविण्याची घटना आज सकाळी घडली. या मंगळसुत्राची किंमत 3 लाख रुपयांचा आसपास असल्याचे सांगीतले जाते.

आज सकाळी संगीता आणि त्यांचे पती रामनाथ गावकर हे साखळी येथे जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्यासाठी त्यांना मडगाव कदंब बस स्थानकावर जाण्यासाठी बस पकडायची होती.

आपल्या बसची वाट पहात ती दोघे बस स्टॉपवर थांबलेली असताना मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञाताने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवून त्वरित घटना स्थळावरून पळ काढला अशी माहिती या दांपत्याने दिली. या प्रकरणी मडगाव पोलिस स्थानकावर तक्रार देण्यात आली आहे.

Crime
Aldona MRF Shed: माझ्याविरोधात तक्रार करण्यासाठीच रामतळे ग्रामस्थांचा वापर - कार्लुस फेरेरा

गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून काही दिवसांपूर्वी कोरगांव येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. हळदीकुंकू कार्यक्रम संपवून घरी चाललेल्या महिलांच्या घोळक्यातील एका महिलेच्या गळयातील मंगळसूत्र पळवण्याचाही प्रयत्न झाला होता.

मात्र सुदैवाने ग्रुपमधील इतर महिलांच्या सतर्कपणामुळे आणि धारिष्ट्यपणामुळे चोरटे पळून गेले. अशा घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाचा राज्यात धाक आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Crime
Goa Budget 2024: गुड फॉर नथींग! अर्थसंकल्प निवडणुकीवर डोळा ठेवून सादर केल्याचा युरींचा आरोप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com