Goa Cricket: मोहित रेडकरचे संस्मरणीय पदार्पण, पहिल्याच सामन्यात टिपले मध्य विभागाचे तीन गडी

देवधर करंडक ः मध्य विभागाविरुद्ध तीन बळी
Goa Cricket
Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket गोव्याचा युवा ऑफस्पिनर मोहित रेडकर याने मंगळवारी देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पदार्पण संस्मरणीय ठरविले. दक्षिण विभागातर्फे पहिलाच सामना खेळताना त्याने मध्य विभागाचे तीन प्रमुख गडी टिपले.

पुदुचेरी येथे मंगळवारी स्पर्धेच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना झाला. अगोदरच अंतिम फेरी गाठलेली असल्यामुळे दक्षिण विभागाचा कर्णधार मयांक अगरवाल याने के. बी. अरुण कार्तिक, आर. साई किशोर व विद्वत कावेरप्पा या तीन प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आणि गोव्याचे अर्जुन तेंडुलकर व मोहित रेडकर, केरळचा सिजोमॉन जोसेफ यांना संधी दिली.

Goa Cricket
Agriculture: जलस्त्रोत खात्याने उभारलेल्या बंधाऱ्यांमुळे बागायतींचे नुकसान, गुळेलीत शेतकरी त्रस्त

मोहितने केले संधीचे सोने

संधीचे सोने करताना २२ वर्षीय मोहितने संघातील अनुभवी ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर (१०-०-३७-०) याच्या साथीत मध्य विभागाला डावाच्या मध्यास कोंडीत पकडले. मोहितने तीन गडी बाद करताना मागील आयपीएल स्पर्धा गाजवलेला रिंकू सिंग याला पायचीत बाद केले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यकंटेश अय्यर याचा झेल स्वतःच्याच गोलंदाजीवर टिपला, तर माजी कसोटीपटू कर्ण शर्मा याला स्लिममध्ये सुंदर याच्याकरवी झेलबाद केले.

मध्य विभागाने ९ बाद २६१ धावांची मजल मारली. त्यात मोहितचे ९-०-५१-३ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. यावेळच्या स्पर्धेत उत्तर पूर्व विभागाविरुद्ध पदार्पण केलेला गोव्याचा पाहुणा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने मंगळवारच्या लढतीत १०-०-६५-२ असे गोलंदाजी पृथक्करण राखले.

Goa Cricket
Asian Games: गोमंतकीय फुटबॉलपटूंविना भारतीय संघ

गोव्याचे दोघे एकत्रित संघात

दक्षिण विभाग संघातून एका वेळी गोव्याचे दोघे जण खेळण्याची घटना दुर्मीळ ठरली. अर्जुन व मोहित यांची बीसीसीआय निवड समितीने आगामी इमर्जिंग खेळाडू शिबिरासाठी निवड केली आहे.

त्या निकषावर त्यांच्या गुणवत्तेची चाचपणी करण्यासाठी त्यांना देवधर करंडक स्पर्धेसाठी संधी देण्यात आली होती. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा पुत्र अर्जुन २०२२-२३ मोसमापासून गोव्याच्या संघातील पाहुणा खेळाडू आहे.

मोहितने गतमोसमातील रणजी स्पर्धेत पदार्पणात डावात ५ गडी टिपण्याचा पराक्रम साधला होता. एकंदरीत त्याने ७ सामन्यांत दोन वेळा डावात पाच गडी बाद करताना एकूण १९ विकेट टिपल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com