गोवा आध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, क्लब रात्री 12 नंतर बंद करावेत; दुर्घटना कमी होतील- मंत्री विश्‍‍वजीत राणे

Vishwajit Rane On Nightclub: नाईट क्‍लबवर निर्बंध लादणे गरजेचे असून, गोव्‍याला अाध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र म्‍हणून विकसित करण्‍याची गरज असल्‍याचे मत मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी व्‍यक्त केले.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नाईट क्‍लबवर निर्बंध लादणे गरजेचे असून, गोव्‍याला अाध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र म्‍हणून विकसित करण्‍याची गरज असल्‍याचे मत मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्‍यक्त केले.

हडफडे येथील रोमियो लेन क्‍लबला लाग लागून २५ जणांचा मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटनेच्‍या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांच्‍याशी पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्‍हणाले, गोव्‍याला अध्‍यात्‍मिक पर्यटनाचे केंद्र म्‍हणून विकसित करणे गरजेचे आहे.

Vishwajit Rane
Goa Drowning Death: शेजाऱ्याकडे ठेवला, खेळताना तळ्यात पडला; तळेबांद येथे दीड वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

भारतात अाध्‍यात्‍मिक पर्यटन वाढावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास प्रयत्‍न करीत आहेत. त्‍याच धर्तीवर गोव्‍यातील अध्‍यात्‍मिक पर्यटनाला अधिकाधिक बळकटी मिळावी, असे आपले वैयक्तिक मत आहे. आपण यासंदर्भात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याशी चर्चा करणार आहे. आपल्‍या या मागणीला राज्‍यातील सर्वच पालकांचे समर्थन असेल, असेही मंत्री राणे म्‍हणाले.

Vishwajit Rane
Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

क्लब रात्री १२ नंतर बंद करावेत

राज्‍यातील नाईट क्‍लबवर निर्बंध येणे आवश्‍‍यक आहे. अशी आस्‍थापने रात्री १२ पर्यंत बंद होणे गरजेचे आहे. तसे झाल्‍यास राज्‍यातील दुर्घटना निश्‍चित कमी होतील, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com