VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Goa spa scam: निसर्गरम्य किनारे आणि पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेले गोवा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
Goa spa scam
Goa spa scamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: निसर्गरम्य किनारे आणि पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेले गोवा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत असून, तिने गोव्यातील बागा आणि कळंगुट परिसरात होणाऱ्या स्पा फ्रॉडबद्दल पर्यटकांना सावधानतेचा सल्ला दिला आहे. गोव्यात येणाऱ्यांनी सावध राहावे, अन्यथा त्यांचे खिसे रिकामे होऊ शकतात, असा इशारा या महिलेने दिला आहे.

बागा आणि कळंगुटमधील स्पा सेंटरचा सुळसुळाट

गोव्यातील उत्तर भागात असलेल्या बागा आणि कळंगुट या किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. याचाच फायदा घेत काही अनधिकृत स्पा सेंटर्स येथे सक्रिय आहेत. व्हिडिओतील महिलेच्या म्हणण्यानुसार, येथील स्पा सेंटर्समध्ये पर्यटकांची मोठी आर्थिक फसवणूक केली जाते. अनेकदा बाहेरून आकर्षक दिसणाऱ्या या सेंटर्समध्ये गेल्यावर पर्यटकांना धमकावले जाते किंवा त्यांच्याकडून अवाजवी पैसे उकळले जातात. त्यामुळे पर्यटकांनी कोणत्याही अनोळखी स्पा सेंटरमध्ये जाण्यापूर्वी विचार करावा.

Goa spa scam
Goa ZP Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्‍या! जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी 8,69,356 मतदार बजावणार हक्क; 5 तृतीयपंथीय मतदार रिंगणात

एजंटच्या जाळ्यात अडकू नका

रस्त्यांवर फिरणारे एजंट स्वस्तात स्पा किंवा क्लबमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. "या एजंटच्या जाळ्यात चुकूनही अडकू नका," असे आवाहन या महिलेने केले आहे. हे एजंट कमिशनसाठी पर्यटकांना चुकीच्या ठिकाणी घेऊन जातात. एकदा का तुम्ही त्यांच्यासोबत गेलात की, तिथून सुखरूप बाहेर पडणे कठीण होते. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा एजंटपासून दूर राहणेच हिताचे ठरते.

ट्रान्सजेंडरची वाढती संख्या

गोव्यातील नाईट लाईफ आणि क्लबमध्ये पार्टी करण्यासाठी येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र, या क्लबमध्ये मुला-मुलींच्या नावाखाली फसवणूक केली जाते. महिलेने व्हिडिओत नमूद केल्यानुसार, या परिसरात ट्रान्सजेंडरची संख्या मोठी असून त्यांना ओळखणे कठीण असते. अनेकदा पर्यटकांना जाळ्यात ओढून नंतर त्यांची लूट केली जाते. ही बाब अत्यंत गंभीर असून पर्यटकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे.

Goa spa scam
Goa ZP Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्‍या! जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी 8,69,356 मतदार बजावणार हक्क; 5 तृतीयपंथीय मतदार रिंगणात

ऑनलाइन बुकिंग करताना सर्तकता

अनेक पर्यटक सोयीसाठी ऑनलाइन स्पा किंवा हॉटेल बुकिंग करतात. मात्र, महिलेने या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ती म्हणते की, "ऑनलाइन स्पा बुक करू नका किंवा आगाऊ पैसे देऊ नका." ऑनलाइन पेमेंट केल्यावर अनेकदा सेवा दिली जात नाही किंवा दिलेली माहिती खोटी निघते. यामुळे तुमचे पैसे तर जातातच, शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com