Goa Crime: महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! नोकरी शोधणाऱ्या तरुणीवर स्पा चालकाकडून अत्याचार, पोलिसांनी संशयिताला केले जेरबंद

Goa Spa Owner Rape Case: नोकरीचे खोटे आमिष दाखवून उत्तर प्रदेशातील एका २३ वर्षीय तरुणीवर कथित बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांमार्फत स्पा चालकाला अटक केली आहे.
Goa Spa Owner Rape Case
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: नोकरीचे खोटे आमिष दाखवून उत्तर प्रदेशातील एका २३ वर्षीय तरुणीवर कथित बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांमार्फत स्पा चालकाला अटक केली आहे. सुरुवातीला पीडितेने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.

मात्र, कळंगुट पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करून हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत आणि गुन्हा दाखल करून संशयिताला तात्काळ अटक केल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील एका २३ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून १० जुलै २०२६ रोजी गोव्यात बोलावण्यात आले होते.

Goa Spa Owner Rape Case
Goa Cyber Crime: फोंड्यात ऑनलाईन भामट्यांचा मोठा धुमाकूळ! अवघ्या 6 महिन्यांत नागरिकांना 15 लाखांचा गंडा, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

पीडितेने आरोप केला होता की, कळंगुट-कांदोळी पट्ट्यातील स्पा चालक संशयित अदवेश राय याने तिला एका हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ११ जुलै रोजी, जेव्हा ती तक्रार करण्यासाठी कळंगुट पोलिस ठाण्यात गेली, तेव्हा तेथील पोलिसांनी तिला सहकार्य न करता तक्रार मागे घेण्याचा सल्ला दिला, असा तिचा दावा होता. तिला १० हजार रुपये देऊन आणि विमानाचे तिकीट काढून देऊन गोव्याबाहेर पाठवण्यात आले, असा आरोपही तिने केला होता. मात्र, तिने न्यायासाठी पुन्हा गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांचे अधिकृत स्पष्टीकरण...

दुसरीकडे, कळंगुट पोलिसांनी पीडितेचे सर्व आरोप फेटाळून लावले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला, केवळ लेखी जबाब घेतला आणि त्यानंतर आपल्याला विमानतळावर सोडून दिले, हा पीडितेने केलेला आरोप पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. पीडितेचे हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे, चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिस ठाण्यात १२ जुलै रोजी गुन्हा दाखल केला व अवघ्या २४ तासांत म्हणजेच १३ जुलै रोजी संशयित अदवेश राय याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com