Goa: अवैद्य अतिक्रमणविरोधात सोनुर्लेकरांची पालिका संचालकांकडे तक्रार

सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता तसेच पालिका संचालकाकडे तक्रार दाखल केली आहे.
murgao
murgaoDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठाच्या 1997 च्या आदेशाचे उल्लंघन करून फुटपाथ आणि सार्वजनिक मालमत्तेवरील अवैद्य अतिक्रमणविरोधात गोवा फर्स्ट या बिगर गोमंतकीय संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर (Parashuram Sonurlekar) यांनी मुरगाव नगरपालिका मुख्याधिकारी, सहाय्यक रस्ता अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक वास्को, वाहतूक विभाग उपजिल्हाधिकारी मुरगाव तालुका व भाजी मार्केट मधील दुकान क्रमांक 1 व 34 दुकान मालकाविरुद्ध मुख्य सचिव दक्षिण गोवा जिल्हाधिकारी पोलिस महासंचालक, सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता तसेच पालिका संचालकाकडे तक्रार दाखल केली आहे.

परशुराम सोनुर्लेकर यांनी आपल्या तक्रारीत मुरगाव पालिका कार्यक्षेत्रातील पदपथावर करण्यात येत असलेल्या अवैद्य अतिक्रमणाचा विरुद्ध मुख्याधिकाऱ्यांना कित्येकवेळा तक्रार दाखल केली. मात्र काही निवडक विक्रेत्याविरुद्ध कारवाई करताना त्यांनी बाकी विक्रेत्याविरुद्ध तक्रार करण्यास सोईस्कर समजले नाही. येथील भाजी मार्केट मधील दुकान क्रमांक १ व ३४ या दुकानदाराकडून वर्षानुवर्षे अवैद्य अतिक्रमण चालू आहे. मात्र या निवडक दुकानदाराविरुद्ध पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास डोळेझाक केली आहे. सदर दुकानदार अवैध अतिक्रमण करून आपला माल येथील राष्ट्रीय महामार्ग एफएलगोम्स रोडवर लावत आहे. हा रस्ता अवजड व इतर वाहनांच्या रहदारीसाठी आहे. तसेच सार्वजनिक वाहन पार्किंगसाठी व लोकासाठी ये जा करण्यासाठी आहे.

murgao
Goa : मांद्रे विकासाला मोठा हातभार : आमदार दयानंद सोपटे

दुकानदारांच्या सदर अतिक्रमणाविरुद्ध पालिकेकडून कोणताच प्रकारचा दंड आकारला जात नाही. तसेच येथे वाहतूक रहदारी पोलिस तैनात करण्यात येत नसल्याने वाहतूक रहदारी कोंडी होत आहे. तसेच इथे असलेला ट्राफिक साईन बोर्डचा वापर दुकानदारांनी प्लास्टिक बांधण्यासाठी केला आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अध्यापनात येत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागानेही या अतिक्रमणावर विरुद्ध डोळे झाक केली आहे.

murgao
Goa: वीज ग्राहकांना 300 युनिट मोफत विजेचा फायदा होणार नाही - वीजमंत्री

याव्यतिरिक्त टी बी कुन्हा चौक वास्को, मासळी मार्केट जवळ, साळगावकर हाऊस जवळ अतिक्रमणांना ऊत आला असून, मुख्याधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांना या अतिक्रमणाची कारवाई करण्यास सोईस्कर समजले नसल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या १९९७ च्या आदेशाचे उल्लंघन असून या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोनुर्लेकर यांनी तक्रारीत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com