प्रेषित मुहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, गोव्यात मुस्लिम समाज आक्रमक; कारवाई करण्याची मागणी

Goa social media religious insult: मुस्लिम धर्मगुरूंच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींना तत्काळ अटक करावी
muslim community outrage
muslim community outrageDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: मुस्लिम धर्मगुरूंच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी साखळी येथील मुस्लिम बांधवांनी डिचोली पोलीस ठाण्यावर धडक दिली. या सोबतच या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

माहितीनुसार, ईद सणाच्या काही दिवसानंतर एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूंच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधाने केली होती. याची माहिती मिळताच मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली.

यानंतर साखळीतील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत थेट डिचोली पोलीस ठाणे गाठले. धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा टिप्पणी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

muslim community outrage
First Muslim Invasion On India: भारतावर पहिले मुस्लिम आक्रमण कधी झालं?

मुस्लिम बांधवांच्या म्हणण्यानुसार, गोव्यातील सर्व लोकं सलोख्याने आणि शांततेने एकत्र राहतात. मात्र, अशा आक्षेपार्ह कमेंट्समुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेतच, पण राज्याची शांतताही बिघडली आहे.

मुस्लिम बांधवांनी एकत्र येत गोवा सरकारनेही याकडे लक्ष देऊन ही अज्ञात व्यक्ती कोण आहे, याचा शोध घ्यावा अशी मागणी केली. मुस्लिम समाजासाठी त्यांचे धर्मगुरूच त्यांचे सर्वस्व आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात अशी घटना घडू नये अशी विनंती त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com