Akshata Chhatre
इतिहासातील दाखल्यांच्या आधारे भारतावर अनेक परकीय आक्रमणं झाली असल्याच्या नोंदी पाहायला मिळतात. यांपैकी मुस्लिम सत्तांनी भारतावर सर्वात अगोदर आक्रमण केलं होतं.
आपल्याला मुघलांचा इतिहास माहितीये, मात्र हे सुद्धा लक्षात घ्या की मुघलांशिवाय सिद्धी, खिलजी, सुलतान अशा अनेक सत्तानी भारतावर आक्रमण केलं, भारताला लुटून नेलं.
पण कधी विचार केला आहे का, भारतावर पहिल्यांदा आक्रमण करणारा मुस्लिम राज्यकर्ता कोण असेल? ते मुघल किंवा सिद्धी नक्कीच नाही.
७१२ ई. साली मोहम्मद बिन कासिमने सिंध प्रांतावर यशस्वी आक्रमण केलं आणि हे आक्रमण भारताच्या इतिहासातील मुसलमानांकडून करण्यात आलेलं पाहिलं आक्रमण असल्याची नोंद इतिहासात आहे.
तो अरब सैन्याचा एक कुशल सेनापती होता. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्याने आपले सैन्य नेतृत्व करत सिंधवर ताबा मिळवला होता. त्याच्या आक्रमणानंतर सिंधमध्ये इस्लामी संस्कृती व धर्मप्रसाराला सुरुवात झाली. ही घटना भारतात इस्लामच्या प्रवेशाची सुरुवात मानली जाते.
यानंतर कासिमने सिंधमधील अनेक भाग जिंकून तेथे मुसलमानी प्रशासनाची स्थापना केली. या विजयामुळे अरब साम्राज्याचा भारतात राजकीय कारभार सुरु झाला. या आक्रमणाने भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात मोठा बदल घडून येऊ लागले, स्थानिक राज्यकर्त्यांचे बळ कमी होऊ लागले.