Shripad Naik: श्रीपाद नाईक यांचा शनिवारी वाढदिवस, लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

Shripad Naik birthday: श्रीपाद नाईक यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या समर्पण या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होणार असून या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरद सबनीस यांनी केले.
Shripad Naik
Shripad NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सापेंद्र, जुने गोवे येथील निवासस्थानी लोकोपयोगी उपक्रम आरोग्य शिबिरे तसेच श्रीपाद नाईक यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या समर्पण या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होणार असून या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरद सबनीस यांनी केले.

ते पर्यटन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी गोविंद काळे आणि सुभाष नाईक उपस्थित होते.गोविंद काळे म्हणाले, श्रीपाद नाईक यांच्या राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील वाटचाल, त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या समर्पण या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा सकाळी १० वा होणार.

Shripad Naik
Goa Education: 6 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच यापुढे पहिलीमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी गोविंददेव गिरी महाराज उपस्थित राहतील, त्यासोबतच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषिमंत्री रवी नाईक, साबाखा मंत्री दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा मिळावी हा या मागचा उद्देश असल्याचेत्यांनी सांगितले.

Shripad Naik
Goa University: गोवा विद्यापीठ ‘युनायटेड पॅनल’ विजयी! ऋतिक मांद्रेकर अध्यक्ष; ‘टुगेदर फॉर’ गटाला धक्का

शिबिर, सत्काराचे आयोजन

वाढदिनानिमित्त स्वस्थ नारी,सशक्त परिवार आणि पोषण माह कार्यक्रमांतर्गत विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार यात नेत्रचिकित्सा, चष्मे वाटप, फिरत्या कॅन्सर रोग निदान व्हॅनच्या माध्यमातून चाचणी, वनौशधी व इतर रोपट्यांचे वाटप व इतर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आली असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमादरम्यान घनपाठी योगेश बोरकर, कला आणि संस्कृतीमंत्री रमेश तवडकर आणि आंतरराष्ट्रीय कराटेपटू भुवनेश्‍वरी जाधव यांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com