गोव्याने केवळ खाणकाम आणि पर्यटनावर अवलंबून न राहता उद्योगक्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली पाहिजे असे मत केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. गोवा MSME अधिवेशन येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत गोव्याने BSE SME IPO सह सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व विविध योजना आणि प्रोत्साहनांचा वापर करून त्यांचे व्यवसाय आणि गोव्याची अर्थव्यवस्था वाढवण्याचे आवाहन केले. गोव्याचे पर्यटनावरील अवलंबित्व कमी करून आर्थिकदृष्टीने संपन्नता आणण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.