Calangute: कळंगुट येथील डान्सबार मालकांविरोधात युवकाने दाखल केला मानहानीचा दावा

गैरप्रकारांविरोधात आवाज उठविल्याने जाणीवपुर्वक विरोध करत असल्याचा आरोप
Calangute Youth Defamation
Calangute Youth Defamation Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute: कळंगुट येथील सनी कांदोळकर या युवकाने कळंगुट येथील नाईट क्लबचे मालक विपिन सिंग आणि देव यादव यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. सिंग आणि यादव यांनी कांदोळकर यांना गुंड, खंडणीखोर म्हटले होते.

या दोघाही डान्सबार मालकांनी 21 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माझ्याविरोधात निराधार आणि चुकीचे आरोप केले होते. त्यामुळे हा दावा दाखल करत असल्याचे कांदोळकर यांनी म्हटले आहे.

Calangute Youth Defamation
Baga Drug Case: बागा येथे 5.10 लाख रूपयांच्या अमली पदार्थांसह युपीच्या युवकास अटक

कांदोळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्या पत्रकार परिषदेत विपिनकुमार सिंग आणि देव रविकांत यादव यांनी कांदोळकर यांचा उल्लेख गुंड आणि खंडणीखोर असा केला होता. दोन वर्षांपुर्वी कांदोळकर यांनी साडे तीन लाख रूपये खंडणी मागितल्याचा आरोपही त्या पत्रकार परिषदेत सिंग आणि यादव या डान्सबार मालकांनी केला होता.

Calangute Youth Defamation
Manohar International Airport: टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन मागे; टॅक्सी स्टॅण्डसाठी मान्यता

कांदोळकर यांनी म्हटले आहे की, रविकांत यादव यांनी वारंवावर माझा उल्लेख गुंड असा केला. विपिन कुमार यांनी तर माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, असे म्हटले होते. हे माझ्यासाठी अपमानजनक आहे. उलट विपिन कुमार हेच नामचीन गुंड आहेत, त्यांच्यावर कळंगुट येथे अनेक गुन्हे नोंद आहेत. हे लोक कळंगुट आणि उत्तर गोव्यातील किनारी भागात बेकायदा डान्सबार चालवत आहेत. त्यातून एंजॉयच्या नावाखाली पर्यटकांची लूट करत आहेत. माझ्यासह अनेक गावकऱ्यांनी अशा प्रकारांविरोधात आवाज उठवायला सुरवात केल्यानंतर जाणीवपुर्वक माझी बदनामी करण्यासाठी माझ्याविरोधात खोट्या तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीसोबत कांदोळकर याने त्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ फुटेज असलेली सीडीही जमा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com