गोवा हादरला! सहा वर्षीय शालेय मुलीवर बलात्कार; शाळेत ने - आण करण्याची ज्याच्यावर होती जबाबदारी त्यानेच केला घात

Goa Crime News: सहा वर्षीय शालेय पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
Goa News Latest Update
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षीय शालेय मुलीवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत घेऊन जाण्याची आणि परत घेऊन येण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपविण्यात आली होती त्यानेच हे दुष्कर्म केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये पर्वरीत ही घटना घडली.

पीडित मुलीच्या आईने याबाबत पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपीने पीडितेच्या गुप्तांगांना स्पर्श केला, लैंगिक छळ करुन बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे.

संशयिताने पीडितेला धमकी देखील दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

Goa News Latest Update
Goa Nightclub Fire: 'क्‍लबमधील अग्निसुरक्षा तपासा, मगच परवाने द्या'! मायकल लोबो; अधिवेशनात विधेयक मंजूर करण्‍याची मागणी

बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. संशयिताचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली.

पेलिसांनी संशयिताला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी संशयिताच्या घराबाहेर एकत्र येत त्याच्यावर कारवाईची मागणी केली तसेच, त्याची गावातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील स्थानिकांनी केली. 

Goa News Latest Update
Bardez: आमदारांची फौज असूनही बार्देशात भाजपला 6 जागा! मंत्री हळर्णकर प्रभावहीन; ‘आरजी’चा जनसंपर्क वाढला

संशयिताला अगोदरच अटक केल्याची माहिती पोलिसांनी स्थानिकांना देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कायद्यानुसार त्याच्याविरोधात पुढील कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी संतप्त जमावाला यावेळी सांगितले. पंच सदस्यांनी देखील यावेळी मध्यस्थी करुन जमावाला शांत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com