Ramesh Tawadkar: आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारी माणसेच इतिहास घडवतात

Ramesh Tawadkar: ‘ऋषितुल्य धन्वंतरी गोमंत भूषण डॉ. सखाराम गुडे’ पुस्तकाचे प्रकाशन
Ramesh Tawadkar | Goa News
Ramesh Tawadkar | Goa News Dainik Gomantak

Ramesh Tawadkar: गोमंतभूषण डॉ. सखाराम गुडे यांनी हयातभर समर्पितवृत्तीने धन्वंतरी म्हणून रुग्णसेवा करावी, हे एकच ध्येय बाळगले. त्यांचे जीवनचरित्र नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

डॉ. सखाराम गुडे यांच्यासारखी आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजाच्या हितासाठी कार्यकरणारी माणसेच इतिहास घडवतात,असेही ते म्हणाले.

गोमंतकीय साहित्यिक रमेश वसंकर यांनी लिहिलेल्या ‘ऋषितुल्य धन्वंतरी गोमंत भूषण डॉ. सखाराम गुडे’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने तवडकर बोलत होते.

अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अनिल समांत, सन्माननीय पाहुणे म्हणून किसन फडते, सरपंच पल्लवी शिरोडकर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुभाष प्रभुदेसाई तसेच लेखक रमेश वंसकर हे व्यासपीठावर होते.

लेखक रमेश वंसकर यांनी मनोगत व्यक्त केले. किसन फडते. सरपंच पल्लवी शिरोडकर यांनी डॉ. गुडेंच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे झाली.

Ramesh Tawadkar | Goa News
Goa Trucks Owners Issue: ...अन्यथा आंदोलनाचे शस्त्र उपसणार; खाण ट्रक मालकांनी दिला अल्टिमेटम

"नाणं कमविण्यासाठी जीवन जगावं, की जीवनाचं गाणं व्हावं, यासाठी कार्यरत व्हावं, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. परंतु डॉ. सखाराम गुडे यांनी रुग्णांच्या जीवनात प्रकाश आणला. डॉ. गुडेंची परंपरा चालवणारे डॉक्टर गोमंतकाच्या पुण्यभूमीत घडावेत."

- प्रा. अनिल सामंत,मुख्य वक्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com