रेंट-अ-कार चालकाचा उतरवला माज! 44 वर्षीय महिलेला चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्याच्या भामट्याला बेड्या; मडगाव पोलिसांची कारवाई

Pune Youth Arrested Margao Police: शिर्लीबांध येथे महिला दुचाकीचालकाला धडक देऊन पळ काढणाऱ्या ‘रेंट-अ-कार’ चालकाला मडगाव पोलिसांनी अखेर जेरबंद केले.
rent a car driver attack case
rent a car driver attack caseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: शिर्लीबांध येथे महिला दुचाकीचालकाला धडक देऊन पळ काढणाऱ्या ‘रेंट-अ-कार’ चालकाला मडगाव पोलिसांनी अखेर जेरबंद केले. स्वराज जगताप (१९), असे त्याचे नाव असून तो मूळचा पुणे (महाराष्ट्र) येथील आहे. कळंगुट येथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गजाआड केले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १९० अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेली थार जीपही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मंगळवारी हा अपघात घडला होता. भरधाव वेगाने जीप चालवत असताना जगताप याने एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. यात निविया गोम्स (४४) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत.

rent a car driver attack case
Margao Railway Station: दारुड्याला वाचवण्‍यासाठी दोन पोलिसांमध्‍येच जुंपली! मडगाव रेल्‍वे प्‍लॅटफॉर्मवर ‘फ्रिस्‍टाईल’ हाणामारी

डॅश-कॅमच्या मदतीने शोध

संबंधित जीप भाड्याने देणाऱ्या व्यक्तीलाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली. गोम्स या दुचाकीवरून जात असताना थार जीपने त्यांना धडक दिली. त्यामुळे त्या दुचाकीवरून खाली पडून अन्य एका कारवर आदळल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर (Accident) जीप चालक वाहनासह फरार झाला होता. मडगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि डॅश-कॅम कॅमेऱ्यांच्या मदतीने संबंधित जीपची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर अन्य पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले आणि अखेरीस संशयिताला वाहनासह ताब्यात घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com