गोवा-शिर्डी, गोवा-तिरुपती थेट विमानसेवा सुरू करावी, सदानंद शेट तानावडेंची राज्यसभेत मागणी

Goa flights: गोमंतकीय भाविकांच्या सोयीसाठी गोवा-शिर्डी आणि गोवा-तिरुपतीदरम्यान दररोज थेट विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी सदानंद शेट तानावडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
Sadanand Shet Tanavade
Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोमंतकीय भाविकांच्या सोयीसाठी गोवा-शिर्डी आणि गोवा-तिरुपतीदरम्यान दररोज थेट विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी राज्यसभा सदस्य सदानंद शेट तानावडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ‘उडान’ योजनेअंतर्गत या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी थेट हवाई संपर्क जोडल्यास हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

सध्या गोव्यातून शिर्डी किंवा तिरुपतीकडे जाणाऱ्या प्रवाशांना मधल्या शहरांत दीर्घ तासांची प्रतीक्षा, उशिरा मिळणाऱ्या उड्डाणांचा त्रास आणि वाढलेला खर्च अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. थेट उड्डाणांची सुविधा नसल्यामुळे प्रवासाचा कालावधी अनावश्यकपणे वाढतो, ही गंभीर समस्या तानावडे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

Sadanand Shet Tanavade
Goa Nightclub Fire: एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! पतीसह 3 बहिणी गमावणाऱ्या भावनांसमोर मोठे संकट; जीवनाचा आधारच हरपला

तातडीने पावले उचलून ही सेवा सुरू करण्याची आवश्यकता असल्यावर भर देताना तानावडे म्हणाले की, थेट हवाई संपर्क उपलब्ध झाल्यास गोमंतकीय भक्तांसाठी प्रवास अत्यंत सुलभ होईल आणि धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. केंद्राने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा व गोवा-शिर्डी तसेच गोवा-तिरुपती मार्गांवर लवकरात लवकर नियमित उड्डाणे सुरू करावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com