अत्याधुनिक 'शची' नौदलाच्या ताफ्यात, 'गोवा शिपयार्ड'ची गौरवास्पद कामगिरी; 'अचल' तटरक्षककडे सुपूर्द

Launch of INS Shachi NGOPV: गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलासाठी बांधलेले खोल समुद्रातील अत्यानुधिक गस्ती जहाज ‘शची’चे मंगळवारी एका शानदार सोहळ्यात जलावतरण करण्यात आले.
Launch of INS Shachi NGOPV
Launch of INS Shachi NGOPVDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलासाठी बांधलेले खोल समुद्रातील अत्यानुधिक गस्ती जहाज ‘शची’चे मंगळवारी एका शानदार सोहळ्यात जलावतरण करण्यात आले. तसेच ‘अचल’ जहाज भारतीय तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आले.

भारताची नौदल व संरक्षण क्षमता बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. गोवा शिपयार्डचे अध्यक्ष ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी केंद्र सरकारने गोवा शिपयार्डच्या कामगिरीची दखल घेऊन ‘अ’ परिशिष्टात समावेश केल्याचे जाहीर केले.

गोवा शिपयार्डमध्ये आयोजित केलेल्या जलावतरण सोहळ्याला भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच त्यांच्या पत्नी शगुन सोबती, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष ब्रजेश कुमार उपाध्याय, रियर ॲडमिरल विशाल बिश्नोई, गोव्याचे ध्वजाधिकारी रिअर ॲडमिरल अजय थियोफिलस्, न्यू इंडिया इन्शुरन्सच्या सीओ गिरिजा सुब्रम्हणम् तसेच नौदल अधिकारी, गोवा शिपयार्ड अधिकारी उपस्थित होते.

Launch of INS Shachi NGOPV
Goa Weather: थंडीने पल्लवित केलेल्‍या आशा उष्‍म्‍याने मावळल्‍या! काजू, आंबा बागायतदारांची व्‍यथा; दुसरा मोहोर करपला

खोल समुद्रातील अत्यानुधिक गस्ती जहाज शचीचे जलावतरण शगुन सोबती यांच्या हस्ते करण्यात आले. उपाध्याय यांनी एकाच दिवशी दोन मोठे टप्पे गाठणे हे गोवा शिपयार्डची मजबूत अंमलबजावणी क्षमता, उत्कृष्टता,तसेच भारतीय नौदल, भारतीय तटरक्ष दलांसोबतचा भक्कम समन्वय दर्शवित असल्याचे सांगितले. त्यांनी गोवा

शिपयार्डच्या वाढलेल्या उत्पादन वेगावर अधिक भर दिला. गोवा शिपयार्डने गेल्या ६०० दिवसांमध्ये १४ जहाजे सुपूर्द केली आहेत.याचा अर्थ सरासरी दर ४०-४३ दिवसांत एक जहाज तयार केले आहे असा होतो. ही उल्लेखनीय प्रगती गोवा शिपयार्डची वाढलेली औद्योगिक क्षमता, सुव्यवस्थित प्रक्रिया, सागरी जहाजे वेळेवर संबंधितांना वितरित करणे या अटळ वचनबध्दतेचा पुरावा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वदेशीवर भर!

भारतीय तटरक्षक दलाची ‘अचल’साठी ६५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक आहेत. तर ‘शची’मध्ये ७६ टक्के स्वदेशी घटक आहेत ही कामगिरी देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’या उपक्रमांशी पूर्णपणे सुसंगत आहे, असे ‘जीएसएल’चे अध्यक्ष ब्रजेश कुमार उपाध्याय म्हणाले.

Launch of INS Shachi NGOPV
Goa Crime: गिरी येथील महिलेची 2.23 लाखांची फसवणूक; साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

स्वदेशीवर भर!

भारतीय तटरक्षक दलाची ‘अचल’साठी ६५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक आहेत. तर ‘शची’मध्ये ७६ टक्के स्वदेशी घटक आहेत ही कामगिरी देशाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’या उपक्रमांशी पूर्णपणे सुसंगत आहे, असे ‘जीएसएल’चे अध्यक्ष ब्रजेश कुमार उपाध्याय म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com