Shigmo 2026: गोव्यात ‘ओस्‍सय...ओस्‍सय’ची धूम! 19 ठिकाणी होणार शिमगोत्‍सव; कुठे, कधी होणार साजरा? वाचा संपूर्ण वेळापत्रक..

Goa Shigmotsav 2026: गोवा पर्यटन खात्‍यातर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय शिमगोत्‍सवास येत्‍या ५ मार्चपासून फोंड्यातून सुरू होणार आहे.
Goa Shigmotsav 2026
Goa Shigmotsav 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पर्यटन खात्‍यातर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय शिमगोत्‍सवास येत्‍या ५ मार्चपासून फोंड्यातून सुरू होणार आहे. राज्‍यातील नऊ ठिकाणी हा उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. त्‍यासाठीच्‍या साधनसुविधांसाठी देण्‍यात येणाऱ्या निधीत यंदा एक लाख रुपयांची वाढ करण्‍यात येणार असल्‍याची माहिती पर्यटन संचालक केदार नाईक यांनी दिली.

सोमवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) व्‍यवस्‍थापकीय संचालक कुलदीप आरोलकर आणि दीपक नार्वेकर उपस्‍थित होते.

दरम्‍यान, यंदा शिमगोत्‍सवातील रोमटामेळाचे आयोजन सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेतच करण्‍यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजन खात्‍याकडून केले जात असल्‍याचे केदार नाईक यांनी स्‍पष्‍ट केले.

Goa Shigmotsav 2026
Valpoi Shigmotsav: वाळपई ‘ओस्सय ओस्सय’ने दुमदुमली! लोकोत्सवाला सुरुवात; दिव्या राणेंच्या हस्ते शोभायात्रेचे उद्‍घाटन

कुठे, कधी शिमगोत्‍सव?

फोंडा ५ मार्च, कळंगुट : ६, पणजी : ७, म्हापसा : ८, मांद्रे : ९, डिचोली : १०, साखळी : ११, शिरोडा व सांगे : १२, धारबांदोडा व कुंकळ्ळी : १३, मडगाव : १४, पर्वरी व वास्‍को : १५, कुडचडे व वाळपई : १६, केपे व काणकोण : १७, पेडणे : १८ मार्च.

Goa Shigmotsav 2026
Bicholim Shigmo Festival: डिचोलीत दुमदुमणार ‘घुमचे कटर घूम’चा आवाज! बोर्डेतून मिरवणूक; चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धा

पर्यटन खात्‍यातर्फे गेल्‍या काही वर्षांपासून राज्‍यस्‍तरीय शिमगोत्‍सवाचे आयोजन केले जात आहे. त्‍यासाठी प्रत्‍येक केंद्रात साधनसुविधा उभारण्‍यासाठी खात्‍यातर्फे लाखो रुपयांचा निधी दिला जातो. शिवाय आकर्षक बक्षिसेही देण्‍यात येतात. साधनसुविधा उभारण्‍यासाठी केंद्रांना देण्‍यात येणाऱ्या निधीत यंदा एक लाख रुपयांनी वाढ केली जाईल.

-केदार नाईक, पर्यटन संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com