Rohan Khaunte: महत्वाची बातमी! शॅक परवाना शुल्क भरण्याची मुदत आता 25 नोव्हेंबरपर्यंत

Rohan Khaunte: एकूण 364 शॅक्सची शिफारस केली होती त्या 364 शॅक्सपैकी अंदाजे 353 शॅक्सचे वाटप करण्यात आले आहे.
Tourism Minister Rohan Khaunte
Tourism Minister Rohan KhaunteDainik Gomantak

Rohan Khaunte: गोव्यात सध्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून पर्यटकही गोव्यात उतरू लागले आहेत. पर्यटकांची पसंती ही हॉटेल्स सोबतच शॅकला असून शॅक मालकांच्या मागणीनुसार पर्यटन विभागाने शॅक परवाना शुल्क भरण्याची मुदत 17 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या संबंधी माहिती दिली आहे. नवीन शॅक धोरण येण्यापूर्वी पर्यावरण विभागाने राज्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर एकूण 364 शॅक्सची शिफारस केली होती. त्या 364 शॅक्सपैकी अंदाजे 353 शॅक्सचे वाटप करण्यात आले आहे.

Tourism Minister Rohan Khaunte
Goa Police: पर्यटनाला बदनामीचं गालबोट नको; सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांच्या सूचना

यासाठी पैसे भरण्याची मुदतीसाठी 17 नोव्हेंबर ही अंतिम तारीख ठरवण्यात आली होती. मात्र पारंपारिक शॅक मालकांकडून मुदत वाढवून देण्याची विनंती केली जात असल्याने ही मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

शॅक मालक २५ तारीखपर्यंत पैसे देऊ शकतात. तसेच मालकांना तात्पुरती एनओसी आधीच दिली असल्याने ते त्या जागेवर शॅक उभारणीचे काम करू शकतात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com