Goa Police: पर्यटनाला बदनामीचं गालबोट नको; सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांच्या सूचना

Goa Tourism कळंगुट पोलिसांनी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism गोव्यात पर्यटन हंगामाला सुरुवात होणार असून परराज्यातून पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

वाढत्या पर्यटनासोबत राज्यात चोर्‍या, घरफोड्या, खून, मुली-महिलांवरील अत्याचारांच्या प्रकारातही वाढ झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर कळंगुट पोलिसांनी हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांसोबत चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता.

पर्यटन हंगाम सुरू होताना हॉटेल, गेस्टहाऊस, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट मालकांना सुरक्षा उपायांबद्दल माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

Goa Police
Goa Accident Case: कुडचडे मार्केटमध्ये कार चालकाची 2 दुचाकींना धडक; दोघे जखमी

पर्यटन हंगामातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हॉटेलांनी सुरक्षा कर्मचारी वाढवावे आणि गस्त वाढवावी.

प्रत्येक हॉटेलच्या मजल्यावर योग्य ओळखपत्रांसह साध्या वेशातील सुरक्षा कर्मचारी नेमण्यात यावेत. परिसराची सुरक्षितता वाढविण्यासाठी CCTV कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

हॉटेलात येतेवेळी प्रवेशद्वारांवर स्कॅनरचा उपयोग करणे आवश्यक आहे. प्रवेश करणाऱ्या आणि आवारात पार्क केलेल्या सर्व वाहनांसाठी रजिस्टर घालून त्यात त्यांची नोंद ठेवणेही आवश्यक आहे.

हॉटेलमध्ये आल्यावर रेकॉर्डसाठी ठेवलेल्या झेरॉक्स प्रतींसह सरकारने जारी केलेल्या ओळखीचा पुरावा पर्यटकांकडून घेणे आवश्यक आहे.

सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याद्वारे नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे. तसेच हॉटेलमध्ये कामासाठी ठेवलेल्या कर्मचार्‍यांची पडताळणी करून त्यांना ओळखपत्रे देणे अनिवार्य आहे.

आपत्कालीन exit, अग्निशमन व्यवस्था, स्वाइप की ठेवणे आवश्यक आहे. खोल्यांमध्ये संशयास्पद हालचालींवर कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

चेकिंगसाठी पोलीस आल्यावर मागणीनुसार त्यांच्याकडे पर्यटकांच्या माहितीच्या याद्या सादर करणे आवश्यक आहे.

कुठलीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती पुरवणे गरजेचे आहे. तसेच चोरी रोखण्यासाठी पहाटेच्या वेळेत विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

या आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com