अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

Goa Anticipatory Bail Rejected: उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला अर्जुन राम वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामगार पुरवठादार म्हणून काम करीत होता.
Goa Anticipatory Bail Rejected
Sexual Exploitation CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: लग्नाची माहिती लपवून लैंगिक शोषण केल्यासह पीडितेला वारंवार गर्भपात करण्यास भाग पाडल्याच्या आरोपांप्रकरणी संशयित अर्जुन राम याचा अटकपूर्व जामीन अर्ज दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी तपासासाठी संशयिताची पोलिस कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवले.

उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला अर्जुन राम वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामगार पुरवठादार म्हणून काम करीत होता. पीडितेच्या तक्रारीनुसार, जुलै २०२४ मध्ये नोकरीच्या शोधात असताना त्याची तिच्याशी ओळख झाली. आपण अविवाहित असल्याचे भासवून त्याने लग्नाचे आमिष दाखवले. २८ ऑगस्ट २०२४ रोजी बनारस येथील मंदिरात विवाह केल्याचा दावाही पीडितेने केला आहे.

Goa Anticipatory Bail Rejected
Goa Politics: काँग्रेसचा आदर्शवाद, भाजपची वास्तववादी रणनीती; गोव्याच्या राजकारणात नवी लढाई

या संबंधातून ती पाचवेळा गर्भवती राहिली. मात्र, प्रत्येकवेळी गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. जानेवारीत अर्जुनच्या घरी तीन मुलांसह आलेल्या महिलेने आपण त्याची कायदेशीर पत्नी असल्याचे सांगितल्याने पहिला विवाह लपविल्याचे उघड झाले. तसेच मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करून छळ केल्याचाही आरोप पीडितेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.