Goa Political Scandal: AI तंत्रज्ञान वापरुन ऑडिओ केला गेला; पोलिसांनी कथित सेक्स स्कँडलचा स्त्रोत शोधावा- गुदिन्हो

समाज माध्यमांवर गुदिन्हो यांच्या छायाचित्रांसह एका पंच महिला सदस्याची छायाचित्रे झळकली होती.
Goa Political Scandal
Goa Political ScandalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Political Scandal: सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून सध्या सोशल मीडियातून समाजविरोधी वातावरण तयार केले जातेय. राज्यात चवीनं चघळल्या गेलेल्या 'तथाकथित सेक्स स्कँडल'चा उगम कुठून झाला याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहेत. सोशल मीडियातून व्यक्तीची प्रतिमा मालिन केली जात असल्याचे वक्तव्य राज्याचे कॅबिनेट मंत्री मौविन गुदीन्हो यांनी एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.

AI तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या आवाजाची ऑडिओ क्लिप तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सोशल मीडियाचा वापर करून एखाद्याची प्रतिमा उंचावणे किंवा मालिन करण्याचे प्रयोग या प्लँटफॉर्म वरून होऊ लागले आहेत.

ते तथाकथित सेक्स स्कँडल' काय आहे याचा शोध पोलीस घेत असून सोशल मीडियाचा गैरवापर केला जाऊ नये असे गुदीन्हो यांनी खाजगी वाहिनीशी बोलताना सांगितले.

Goa Political Scandal
Sunburn Goa 2023: सनबर्नबाबत आमदार जीत आरोलकरांचं महत्वाचं वक्तव्य; रोजगाराचा मार्ग असला तरी स्थानिकांचा विरोध हा...

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांनी गोव्यातील एका ज्येष्ठ मंत्र्याचे एका महिलेबरोबर असलेले कथित लैंगिक संबंध ट्विटरद्वारे जाहीर केल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली होती.

वास्तविक चोडणकर यांनी कोणा मंत्र्याचे नाव घेतले नसले तरी त्यानंतर समाज माध्यमांवर गुदिन्हो यांच्या छायाचित्रांसह एका पंच महिला सदस्याची छायाचित्रे झळकली होती.

Goa Political Scandal
Betul Bus Accident: भरधाव बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू; बेतुलमधील घटना

या प्रकारानंतर गुदीन्हो यांच्या कार्यालयातून तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच कथित सेक्स स्कँडलप्रकरणी कोणतीही तक्रार नसताना उगीच कोणाची नावे घेऊन बदनामी लोकांनी करू नये. कुणाच्‍या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करणे योग्य नाही असे मुख्यमंत्रांनी देखील सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com