Sunburn Goa 2023: सनबर्नबाबत आमदार जीत आरोलकरांचं महत्वाचं वक्तव्य; रोजगाराचा मार्ग असला तरी स्थानिकांचा विरोध हा...

या फेस्टिवलच्या माध्यमातून पर्यंटन वाढणं ही चांगली गोष्ट असली तरी आपण आपली संस्कृती विसरणे हे योग्य नाही.
Sunburn Goa 2023
Sunburn Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Sunburn Goa 2023 गोव्यातील यावर्षीचा सनबर्न संगीत महोत्सव मोपा येथे होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पेडण्यातील नागरिकांनी त्याला विरोध दर्शवला. पेडणेवासियांनी यासंदर्भातले पत्र सरपंचांना लिहून सनबर्नला परवानगी न देण्याची मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी पेडणे तालुक्यासाठी सनबर्न योग्य नसल्याचा पुनरुच्चार केलाय. सनबर्न हा पर्यटनदृष्ट्या महतवाचा इव्हेंट असून त्यात देश विदेशातील पर्यटक सहभागी होतात.

या फेस्टिवलच्या माध्यमातून पर्यंटन वाढणं ही चांगली गोष्ट असली तरी आपण आपली संस्कृती विसरणे हे योग्य नाही. पेडणे तालुक्यासाठी सनबर्न योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे असल्याचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

पेडणे ही कलाकारांची खाण आहे, अशा परिस्थितीत जर सनबर्न या ठिकाणी आयोजित केला तर तो आमच्या स्थानिक कलाकारांवर अन्याय आहे. आयोजकांना हट्टाने जर सनबर्न पेडण्यातच करायचा असेल तर त्यांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन या फेस्टिवलच्या माध्यमातून इथे रोजगार कसा उपलध होईल हे सविस्तर सांगणे आवश्यक असल्याचे आरोलकर यांनी सांगितले.

Sunburn Goa 2023
Teacher's Day 2023: शिक्षक दिनानिमित्त राज्यातील 8 शिक्षकांना मुख्यमंत्री वशिष्ट गुरु पुरस्कार जाहीर

फेस्टिवलच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याचे मार्ग असून देखील जर त्याला स्थानिकांचा विरोध असेल तर तो या तालुक्यातून रद्द करणेच योग्य होईल असे जीत आरोलकर यांनी गोमंतकीशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com