Goa Crime: फोंडा, कपिलेश्वरी - कवळे येथील एका युवतीला ढकलून तिला जखमी केल्याप्रकरणी वारभाट - कवळे येथील संशयित ओंकार धनंजय कवळेकर याला अखेर आज (शनिवारी) पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले (Police arrested the suspect). त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर (Ponda First Class Magistrate) उभे केले असता तीन दिवसांचा रिमांड (3 Day Remand) देण्यात आला. संशयित ओंकार याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका युवतीला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली असता या युवतीने नकार दिल्याने तिला ढकलून खाली पाडले होते, या प्रसंगात युवती जखमी झाल्याने तिच्यावर इस्पितळात उपचार करण्यात आले.
दरम्यान, संशयित युवकाला अटक करण्यात पोलिस चाल-ढकल करीत (Ponda Police Delay to Arrest) असल्याने शेवटी कपिलेश्वरी - कवळे येथील नागरिकांनी फोंडा पोलिस स्थानकावर मोर्चा नेला (Citizens march at Ponda police station). मात्र फोंडा पोलिसांनी संशयिताला आधीच अटक केल्याचे समजल्याने या नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आणि संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
संशयिताला मोकळा सोडल्यास अन्य घटना घडू शकतात, त्यामुळे पोलिसांनी संशयितावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पंचसदस्य द्रूपदा नाईक, दीपश्री नाईक व सर्वेश नाईक तसेच इतरांनी केली. पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांनी संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.