गोव्यात जाणवतायेत हवामान बदलाचे विपरीत परिणाम; मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केली चिंता

राज्यातील अंतर्गत गावांना कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊसाचा फटका बसत आहे, असे पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
Minister Mauvin Godinho On Climate Change
Minister Mauvin Godinho On Climate ChangeMauvin Godinho Twitter
Published on: 
Updated on: 

Minister Mauvin Godinho On Climate Change

गोव्यात हवामान बदलाचे विपरीत परिणाम जाणवत आहेत. राज्यातील अंतर्गत गावांना कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊसाचा फटका बसत आहे, असे पंचायत आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

जागतिक बँकेने आयोजित केलेल्या इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमाला बुधवारी (21 फेब्रुवारी) माविन गुदिन्हो संबोधित करत होते.

गोवा सरकार शाश्वत विकासावर आधीपासूनच काम करत आहे, असे माविन गुदिन्हो यावेळी म्हणाले.

गोवा लहान राज्य असल्याने जागतिक बँक आणि इतर एजन्सी गोव्यात काम करून, हवामान बदलाविरूद्धच्या लढ्यात एक उदाहरण म्हणून दाखवू शकतात, असेही गुदिन्हो म्हणाले.

Minister Mauvin Godinho On Climate Change
Goa Daily News Wrap: गोव्यात दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा, एका क्लिकवर

हवामान बदल खऱ्या अर्थाने दिसून येत आहे आणि तो गोव्यापर्यंत पोहोचला आहे. पूर्वी लोक पावसाळा चार ते पाच महिने अनुभवत असत आणि हिवाळा आणि उन्हाळाही चांगला असत होता.

अलिकडे गोव्याच्या अंतर्गत गावांना गारपिटीचा तडाखा बसत आहे. तर, पाऊस अशा दिवसांतही पडतोय ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल, असे गुदिन्हो म्हणाले.

हवामान बदलाचा समाना करणे अथवा त्यावर तोडगा काढणे हा केवळ पर्यावरण खात्याचा विषय असू शकत नाही, त्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने काम करणे आवश्यक आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Politics
BL Santhosh Goa Visit
Goa Politics
Gomantak TV Engineers Excellence Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com