Goa Daily News Wrap: गोव्यात दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा, एका क्लिकवर

Goa's Latest News in Marathi (21 February 2024) : पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्त्वाच्या ब्रेकींग न्यूज...
Today's Goa News Live 21 Feb 2024
Today's Goa News Live 21 Feb 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

एफसी गोवाचा पुन्हा पराभव

एफसी गोवाने केलेल्या चुकांचा फायदा नॉर्थईस्ट युनायटेडने उठविला. उत्तरार्धातील खेळात दोन गोल नोंदवत गुवाहाटीच्या संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले, तर यजमान संघाला घरच्या मैदानावर सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

म्हादई नदीत बुडालेल्या कामगाराचा मृतदेह सापडला

गांजे-उसगाव येथील म्हादई नदीत बुडालेल्या कामगाराचा मृतदेह अखेर सापडला. मंगळवारी संध्याकाळी हा कामगार म्हादई नदीवर आंघोळीसाठी गेल्यानंतर बुडाला होता. अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरु होता.

वास्को दुहेरी जळीत प्रकरण ; अनुराग राजवतला जामीन

नवेवाडे-वास्‍को गॅस सिलिंडरचा स्‍फोट व दुहेरी जळीत प्रकरणातील नौदल अधिकारी अनुराग राजावतला जामीन. सिलिंडरचा स्‍फोटात गरोदर पत्नी आणि सासू यांचा झाला होता मृत्यू.

अमित सावंत यांचा मांद्रेच्या सरपंच पदाचा राजीनामा

अमित सावंत यांनी दिला मांद्रेच्या सरपंच पदाचा राजीनामा. कार्यकाळ विभागून घ्यायचे यापूर्वीच ठरल्याने राजीनामा. मांद्रे पोलिस स्टेशनच्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित न केल्याने हल्लीच केले होते आंदोलन.

खुलेआम तीन पत्ती; वेळूस येथे बिहारचे दोघे अटकेत

वेळूस, सत्तरी येथे खुलेआम तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या दोघांना अटक. सिकेंद्र इंद्रदेव भगत (21) आणि भारत कुमार माहतो (30) (दोघेही रा. सत्तरी, मूळ बिहार) यांच्या विरोधात गुन्हा नोंद. वाळपई पोलिसांकडून 2,800 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त.

म्हापसा-हाऊसिंग बोर्डजवळ ब्रेक फेल झाल्याने कार पलटी

म्हापसा-हाऊसिंग बोर्ड रस्त्यावर एका कारचा ब्रेक फेल झाल्याने कार पलटी झाली. यामध्ये कारमध्ये असलेल्यांना किरकोळ दुखापत झाली.

गांजे - उसगाव येथे आंघोळीसाठी गेलेला कामगार बेपत्ता!

गांजे - उसगाव येथे मंगळवारी संध्याकाळी नदीत आंघोळीसाठी गेलेला गुलाम महमद (25, जम्मू काश्मीर) हा कामगार बेपत्ता. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून बेपत्ता कामगाराचा शोध जारी.

परवानगीशिवाय पुतळा उभारणे चुकीचे, सां जुझे द आरियल प्रकरणातील गुन्हे मागे घ्या - फ्रान्सिस सार्दिन

सां जुझे द आरियाल, बेनाभाट येथे शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरुन वाद झाला. पुतळा उभारण्यासाठी परवानगी नसल्याचा आरोप करत स्थानिकांनी याला विरोध केला. तसेच, पुतळ्याचे आनावरण करुन परतत असताना मंत्री फळदेसाई यांच्यावर माती आणि ढेकळ मारुन हल्ला करण्यात आला.

याप्रकरणी आता दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी प्रतिक्रिया दिली असून, परवानगीशिवाय पुतळा उभारणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

म्हापसा पालिकेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा!

म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष यांच्या पाठोपाठ आता उपनगराध्यक्ष विराज फडके यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी (ता. 23) नवीन नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.

रकुल-जॅकी दोन रितीरिवाजानुसार करणार लग्न, किती वाजता घेणार सात फेरे?

बी टाऊनचे लोकप्रिय जोडपे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी आज (बुधवारी) गोव्यात लग्न करणार आहेत. गोव्यातील रॉयल हॉटेलमध्ये हे जोडपे सात फेरे घेतील.

या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स गोव्यात दाखल झाले आहेत. विविध माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, रकुल आणि जॅकी एक नव्हे तर दोन रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

मर्सिडीज अंगावरुन चालविल्याने झोपलेल्या कुत्र्याचा मृत्यू, आगशी पोलिसांत गुन्हा दाखल

झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरुन मर्सिडीज कार चालविल्याने जखमी झालेल्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी समोर आलेल्या व्हिडिओनंतर पोलिसांनी याची दखल घेत कार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. उत्तर गोवा पोलिसांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत माहिती दिली आहे.

फूटपाथवर राहणाऱ्या चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी महिलेला अटक!

कोकण रेल्वेबाहेर फूटपाथवर राहणाऱ्या दोन महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी नातालीन आल्मेदा या महिलेला अटक केली. ती झोपलेल्या बाळाला उचलून आपल्या फ्लॅटवर घेऊन गेली होती. नंतर तपासाअंती पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

सां जुझे आरियल प्रकरणातील गुन्हा मागे घ्यावा: फ्रान्‍सिस सार्दिन

सां जुझे आरियलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जे काही घडले ते चुकीचे आहे. मात्र सरकारने याप्रकरणी ज्या 20 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे तो तात्काळ मागे घ्यावा. द. गोव्‍याचे खासदार फ्रान्‍सिस सार्दिन यांचे वक्तव्य.

नदीत मत्स्यपालन प्रकल्पाचे दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा!

अज्ञातांनी मत्स्यपालन प्रकल्पाचे दूषित पाणी रगाडा नदीत सोडल्याने साकोर्डा ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. ग्रामस्थांची पंचायतीत धडक. पंचायतीने संबंधितांवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी.

संजीवनी साखर कारखान्यासमोर टेम्पो व जीपमध्ये अपघात

संजीवनी साखर कारखान्यासमोर भाजीवाहू टेम्पो व जीप यांच्यात समोरासमोर टक्कर. जीपमध्ये अडकलेल्या चालकाला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्यानंतर गोमेकॉत केले दाखल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com