Goa Red Alert: गोमंतकीयांनो चिंता करु नका, सतर्क राहा! मदतीसाठी नियंत्रण कक्षाला फोन करा; पाहा तालुकानिहाय यादी

Goa Control Room Emergency: सध्याची हवामानाची गंभीर स्थिती पाहता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा (SDMA) ने उत्तर आणि दक्षिण गोव्यात आपले 24x7 नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत केले आहेत. या नियंत्रण कक्षांतून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवली जात असून आपत्कालीन मदत तात्काळ पुरवली जात आहे.
Goa Control Room Emergency
Goa Control Room EmergencyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले असून पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे. 23 ते 25 मे या कालावधीत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात संभाव्य पूरपरिस्थिती, झाडे कोसळणे, जमीन खचणे आणि वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनांची भीती व्यक्त केली जात आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सतर्क

दरम्यान, सध्याची हवामानाची गंभीर स्थिती पाहता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा (SDMA) ने उत्तर आणि दक्षिण गोव्यात (South Goa) आपले 24x7 नियंत्रण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत केले आहेत. या नियंत्रण कक्षांतून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आपत्कालीन मदत तात्काळ पुरवली जात आहे. तसेच, राज्य प्रशासन आणि पोलिस यंत्रणा देखील सतर्क असून किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. याशिवाय, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Goa Control Room Emergency
Goa Weather Update: राज्यात 24 मे पर्यंत हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी

तालुकानिहाय नियंत्रण कक्ष आणि त्यांचे नंबर

1. तिसवाडी: 0832-2225383

2. बार्देश: 0832-2262210

3. डिचोली: 7709136535

4. पेडणे: 0832-2201223 9067910323

5. सत्तरी: 0832-2374090

6. सासष्टी: 0832-2794100

7. मुरगाव: 8793043014

8. फोंडा: 0832-2312121/8766563700

9. धारबंदोडा: 8263825335

10. सांगे: 0832-2604232/7822069067

11. केपे: 0832-2662228-9588427336

12. काणकोण: 9272057863

Goa Control Room Emergency
Goa Weather Update: गोव्यात मान्सूनची चाहूल! 17 मे पर्यंत 'यलो अलर्ट'; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा

गोमंतकीयांसाठी महत्त्वाचे आवाहन

राज्य सरकारने सर्व नागरिकांना पुढील सूचना दिल्या आहेत:

कृपया घरातच थांबा आणि अनावश्यक प्रवास टाळा.

नद्यांच्या आसपास किंवा सखल भागांमध्ये जाणे टाळा.

मोबाईल, टीव्ही, रेडिओ आदी माध्यमांद्वारे अधिकृत माहितीवर सतत लक्ष ठेवा.

विजेचे खांब, झाडे किंवा ओल्या भिंती यापासून दूर राहा.

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ स्थानिक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com