Balrath Employee Strike : मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ बालरथ कर्मचारी उद्यापासून संपावर

संघटनेत संताप : आम्हाला सात वर्षे झुलवत ठेवल्याचा आरोप
Balrath Employee Strike
Balrath Employee StrikeDainik Gomantak
Published on
Updated on

Margao : सरकार बालरथ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्यातील बालरथ कर्मचारी संघटनेने सोमवार १७ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले. बालरथचालकांनी आज बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

नोकरीची सुरक्षा, पगारात वाढ, पीएफ आणि विमा या बालरथ कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. बालरथ कर्मचारी २0१६ पासून आपल्या मागण्या सरकारसमोर मांडत आहेत.

२०१६ मध्ये सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे सरकार या कर्मचाऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखव आहे, असे यावेळी आमदार व्हिएगस यांनी सांगितले.

या सर्व गोंधळासाठी मुख्य सचिव जबाबदार आहेत. असोसिएशनने मुख्य सचिवांना सर्व समस्यांबद्दल ३० जून रोजी पत्र दिले होते. मात्र, त्यावर मुख्य सचिवांनी कोणतीच कारवाई केली नाही.

Balrath Employee Strike
Goa Power Tariff Hike : महागाईत गोयकारांना वीज दरवाढीचा ‘शॉक’; प्रतियुनिट इतक्या टक्क्यांची वाढ

तेव्हाच त्यांनी जलद कारवाई करून समस्या सोडवायला हवी होती, असे त्यांनी सांगितले. आम्हाला मागची सात वर्षे सरकारने झुलवत ठेवले, असा आरोप बालरथ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शांताराम नाईक यांनी केला.

सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी

बालरथ कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी. मानसिक तणावाखाली बालरथ चालकांनी वाहन चालविले, तर अपघात होण्याची शक्यता आहे.

या बाबींवर मुख्य सचिवांनी लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी यावेळी आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली.

Balrath Employee Strike
Goa Congress : कॅसिनो चालकांच्या हितासाठी काम करत भाजप - काँग्रेस | Gomantak Tv

पॅरा शिक्षकांनी घेतली आमदारांची भेट

पॅरा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमदार व्हेंझी व्हिएगस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.

ग्रामीण विकास यंत्रणेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनीही आज व्हिएगस यांची भेट घेऊन त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे निवृत्ती वेतन दिले गेले नाही. यावर विधानसभा अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com