Bailpar Project, Pernem बैलपार-कासारवर्णे येथे साडे पंचवीस कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या जल प्रकल्पाचे आज सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
बहुउपयोगी असा हा प्रकल्प असून या प्रकल्पामधून लगतच्या आयुष रुग्णालय, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पेडणेमधील इतर प्रकल्पांसाठी पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे प्रमोद बदामी यांनी दिली.
पेडणे तालुक्यात सद्या ३० एल. एम. डी. पाण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. हा जल प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत झाल्यावर बैलपार नदीतून ११० एल. एम. डी. पाणी उपसा करण्यात येईल.
यापैकी या प्रकल्पातून मोपा विमानतळासाठी ५ एल. एम. डी कच्चे पाणी तर आयुष इस्पितळाला २ एल. एम. डी. कच्चे पाणी पुरवण्यात येणार आहे. तसेच इतरही काही प्रकल्पांना कच्चे पाणी पुरवण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.