Santosh Cup Football: गटविजेता बनण्यासाठी गोव्यासमोर मोठा टास्क, केरळला पराभूत करावेच लागेल, अन्यथा..

जम्मू-काश्मीरला नमविल्यामुळे आव्हान कायम
Santosh Cup Football
Santosh Cup FootballDainik Gomantak

Santosh Cup Football: माजी विजेत्या गोव्याने रविवारी जम्मू-काश्मीरला 2-1 असे हरवून 77 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रतेच्या आशा कायम राखल्या, पण त्यासाठी त्यांना ‘अ’ गट साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत सलग तीन सामने जिंकलेल्या केरळला पराभूत करावेच लागेल.

बाणावली येथे रविवारी झालेल्या लढतीत केरळने छत्तीसगडला 3-0 असे हरवून +11 गोलफरकासह गुणसंख्या नऊवर नेली आणि गटातील अग्रस्थान भक्कम केले. गटविजेता या नात्याने स्पर्धेची पुढील फेरी गाठण्यासाठी मंगळवारी (ता. 17) त्यांना गोव्याविरुद्ध अखेरच्या लढतीत बरोबरी पुरेशी असेल.

गोव्याचे आता तीन लढतीनंतर +2 गोलसरासरीसह सात गुण झाले आहेत. त्यामुळे केरळला पराजित केले, तरच यजमान संघ गटविजेता बनेल. ‘अ’ गटातील अन्य लढतीत एक विजय व तीन पराभवांमुळे जम्मू-काश्मीरचे आव्हान संपले आहे. छत्तीसगडला तिन्ही सामन्यांत पराभूत व्हावे लागले असून गुजरातचे तीन लढतीतून चार गुण झाले आहेत.

रविवारी जम्मू-काश्मीरविरुद्ध गोव्यासाठी क्लेन्सियो पिंटो याने 16 व्या, तर सेल्विन मिरांडा याने 78 व्या मिनिटास गोल केला. जम्मू-काश्मीरला 45+10 व्या मिनिटास अदनान अयुब याने बरोबरी साधून दिली होती. सकाळच्या सत्रात छत्तीसगडविरुद्ध केरळसाठी ई. साजीश, जुनैन कडवालाथ व निजो गिल्बर्ट यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Santosh Cup Football
Boma Road Expansion: महामार्गाच्या रुंदीकरणास भोमवासियांसह विविध पक्षांचा विरोध, आंदोलनात अनेक NGOची एन्ट्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com