Boma Road Expansion: महामार्गाच्या रुंदीकरणास भोमवासियांसह विविध पक्षांचा विरोध, आंदोलनात अनेक NGOची एन्ट्री

सरकारने जबरदस्ती केल्यास मुख्य महामार्ग रोखण्याचा आंदोलकांचा इशारा
Boma Road Expansion
Boma Road ExpansionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Boma Road Expansion: भोमा गावातून राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात ग्रामस्थांचा पूर्वीपासून विरोध आहे. त्यासाठी स्थानिक लोक सरकारकडे बगलमार्गाची मागणी करीत आहेत. गेल्या एक वर्षापासून स्थानिक लोक सरकारविरुद्ध लढा देत आहेत.यापूर्वी आरजीचे आमदार, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई अन्य नेत्यांनी या ठिकाणी येऊन लोकांना पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान भोमच्या रस्ता आंदोलनात राज्यातील विविध राजकीय पक्षांसोबतच अनेक NGOनी सक्रिय पाठिंबा दर्शवला असून रविवारी झालेल्या भोमच्या सभेत ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जोपर्यंत भोम गावातील चौपदरी रस्ता रद्द होत नाही आणि बगलमार्गाचा विचार सरकार करत नाही, तोपर्यंत आंदोलन ठेवणार असून सरकारने जबरदस्ती केल्यास मुख्य महामार्ग रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

भोमचा चौपदरी रस्ता रद्द करण्यासाठी आणि बगल मार्गाचा पुरस्कार करण्यासाठी मोठे आंदोलन पुकारण्याची आमची तयारी आहे, त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर झोपून आंदोलन करू, असा इशारा भोम येथील महिलांनी दिला.

या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह रेव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर, भाजपचे सुनील देसाई, सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे, परशुराम सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर तसेच आरजीचे विश्‍वेश नाईक व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अमित पाटकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाने 2012 मध्ये रिजनल प्लॅन तयार केला होता, त्याचा पुरस्कार करताना भोमची अस्मिता टिकवण्यासाठी आणि गाव वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम भोमवासीयांच्या पाठीशी राहील.

भोमवासीयांना जाचक ठरलेला आणि गावाला त्रासदायक ठरलेला नियोजित रस्ता त्वरित रद्द करून बगल मार्ग स्वीकारावा. काँग्रेस पक्ष याप्रकरणी मोठे आंदोलन पुकारेल, असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Amit Shah anti drug meeting
House Of Abhinandan Mega project Goa
Esakal No. 1 Marathi Website
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com