Sanquelim News: विक्री प्रदर्शनांच्‍या माध्‍यमातून महिला होतेय ‘सक्षम’, साखळीत ‘स्वयंपूर्ण गोवा’ ला प्रतिसाद

डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पना राबवल्याने ग्रामीण भागातील उत्पादनांना उभारी मिळू लागली.
Sales Exhibition
Sales ExhibitionDainik Gomantak

Sanquelim News सरकारतर्फे महिलांना विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना सर्व क्षेत्रांमध्ये प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच कोविड महामारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेची हाक दिली. त्‍यामुळे ग्रामीण भागातील उत्पादनांना उभारी मिळू लागली.

याच संकल्पनेतून आज ग्रामीण महिलांना बाजारपेठ व व्यावसायिक ज्ञान मिळू शकले. त्यांना आपल्या उत्‍पादनाचे ब्रँडिंग कसे करावे, मार्केटिंग कसे करावे, आर्थिक गुंतवणूक व व्यवस्थापन कसे करावे याचेही प्रशिक्षण मिळू लागले आहे. साखळीत आयोजित विक्री प्रदर्शनाला मिळालेला उदंड प्रतिसाद हे त्‍याचे चांगले उदाहरण आहे.

Sales Exhibition
Bicholim News: डिचोली बनतेय मजूर लोकांचे शहर! मजुरीच्या शोधात 'त्यांचा' बसस्थानक परिसरात वावर

गेली सहा वर्षे आपण साखळीत विक्री प्रदर्शन भरविते. त्यातून सुमारे तीस जणांना रोजगार प्राप्‍त होतो. अशा प्रदर्शनांतून महिलांमधील कलेला उभारी मिळते. त्‍यांच्‍या कलेला राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही ओळख व व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. तसे झाले तर ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही संकल्पना सत्यात उतरेल.

- शिवानी बाक्रे, बाक्रे फूड्‌सच्या प्रमुख

स्थानिक उत्पादनांना लोकही चांगला प्रतिसाद देतात. साखळीत आयोजित करण्यात आलेल्या विक्री प्रदर्शनही त्‍यास अपवाद नव्‍हते. या फॅशनेबल व ब्रँडेडच्या जमान्यात लोक ग्रामीण भागातील स्थानिक पदार्थ, उत्पादनांना जास्त पसंती देतात, हे पाहून बरे वाटले. अशा विक्री प्रदर्शनांमुळे ग्रामीण महिलांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते.

- प्रीती पुरोहित, साखळी

विक्री प्रदर्शनांतून अनेक उद्दिष्टे साध्य होतात. महिला एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाणही होते. एकमेकांकडे असलेल्या ज्ञानाचे वाटप होते. विविध भागांतील महिलांबरोबर ओळखी होतात व प्रत्येकाच्या व्यवसायाचीही चांगली ओळख होते. बाक्रे फूड्‌सने आम्हाला संधी दिली. प्रदर्शनाला प्रतिसाद चांगला मिळाला.

- अंजू फोगेरी, साखळी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com