Bicholim News: डिचोली बनतेय मजूर लोकांचे शहर! मजुरीच्या शोधात 'त्यांचा' बसस्थानक परिसरात वावर

समस्या गंभीर : बेशिस्तपणात वाढ, वाहतुकीस होतोय अडथळा; अपघाताची भीती
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News शहरातील बसस्थानक परिसरात मजुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या मजुरांच्या बेशिस्तपणातही वाढ झाली आहे. मजुरीच्या प्रतीक्षेत गर्दी करणाऱ्या या लोकांचा पुन्हा एकदा बसस्थानक परिसरात वावर वाढला आहे.

रोज सकाळी बसस्थानक परिसरात ‘मजुरांची जत्रा’ भरल्यागत चित्र दिसून येतेय. भररस्त्यावर दाटीवाटीने राहणाऱ्या या मजुरांपासून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, एखादेवेळी अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भीती प्रवासी आणि वाहनचालक व्‍यक्त करत आहेत.

बसस्थानक परिसरातील मजुरांचा अडथळा दूर करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई केली की काही दिवस ते आपली जागा बदलतात आणि मग पुन्‍हा ‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे बसस्थानक परिसरात गर्दी करतात.

डिचोलीत नवीन बसस्थानक बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तात्पुरते पर्यायी बसस्थानकही उभारण्यात आले आहे. तेथे मजुरांच्‍या गर्दीमुळे अपघात होऊ शकतात.

पुन्‍हा ‘येरे माझ्‍या मागल्‍या’

मजुरांनी आपला मोर्चा बसस्थानकाच्या मागच्या बाजूने वळविला. परिणामी काही महिने बसस्थानक परिसर काहीसा मोकळा-मोकळा वाटत होता.

मात्र हळूहळू या मजुरांनी पूर्वीच्या जागेत म्हणजेच बसस्थानकासमोरच आपले बस्‍तान बसविले आहे. सध्या बसस्थानक परिसरात भररस्त्यावर हे मजूर दाटीवाटीने उभे राहिलेले दिसतात.

मोठा अनर्थ घडण्याची शक्‍यता

बसस्थानकाबाहेर दाटीवाटीने उभे राहणाऱ्या या मजुरांमुळे सकाळी साधारण एक-दीड तास वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. प्रवासी बसगाड्या आतबाहेर घेताना मोठा अनर्थही घडू शकतो.

त्यामुळे मजुरांची ही समस्या सोडविण्यासाठी पालिका तसेच संबंधित यंत्रणांनी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.

500 हून अधिक मजुरांचा तांडा

गेल्या बऱ्याच वर्षांपासून डिचोलीत परप्रांतीय मजुरांची समस्या कायम आहे. मजुरीच्या शोधात रोज सकाळी शहरात या लोकांचा वावर असतो. त्यात बसस्थानक परिसरात उभे राहणाऱ्या मजुरांचा आकडा अधिक आहे.

तेथे रोज सकाळी तास-दीड तास कर्नाटक, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार आदी राज्यांतील मिळून 500 हून अधिक मजूर दाटीवाटीने उभे राहिलेले दिसून येतात. रोज सकाळी साधारणत: साडेआठ वाजल्यापासून बसस्थानक परिसरात त्‍यांचा गजबजाट असतो.

शहरातील बोर्डे आदी परिसरातही मजुरांचा वावर वाढतोय. मात्र बसस्थानक परिसरात ही समस्या मोठी आणि गंभीर आहे.

Bicholim News
Engineer's Day: चांद्रयानासाठीची उपकरणे गोव्यातून पाठवली गेली याचाच अर्थ 'गोमंतकीय अभियांत्रिकी क्षेत्रात सक्षम'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com