Traffic In Goa: खरेदीसाठी साखळीला येताय? तर ही बातमी तुमच्यासाठी; पणजीला जाणारा मार्ग होतोय बंद, वाचा सविस्तर..

गणेश चतुर्थी बाजारानिमित्त साखळीतून पणजीला जाणारा मार्ग करणार बंद
Road closed
Road closed Dainik Gomantak

Sanquelim- Panjim Road Closed सध्या गोव्यात गणेश चतुर्थीची लगबग सुरु असून भाविकांची चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झुंबड उडाली असून याच पार्श्वभूमीवर साखळी नगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.

गणेश चतुर्थी बाजारानिमित्त साखळी बाजारात होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीत वाहनांची गर्दी होऊ नये आणि वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी साखळी बाजारातून पणजीला जाणारा रस्ता चार दिवसांसाठी बंद केला जाणार आहे.

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी आज ही माहिती दिली असून ग्राहकांनी हि माहिती लक्षात घेऊन खरेदीसाठी जाण्याचे नियोजन करावे.

गणेश चतुर्थीनिमित्त साखळी बाजारात येणाऱ्या लोकांना वाहनांमुळे अडचण व गैरसोय होऊ नये यासाठी काही नियोजन करण्यात आले आहे. बाजारातील सर्व नो एंट्री सक्तीने वाहनांसाठी बंद केल्या जाणार आहेत.

बाजारातील रस्त्यांवर दुकानदारांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजूला पार्क न करता नगरपालिका मैदानाजवळ पार्क कराव्यात.

तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव जागोजागी वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी दिली. तर या वाहतूक व्यवस्थेला सर्वांनी सहकार्य करावे अहे आवाहन उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांनी केले आहे.

Road closed
Goa Electricity: ट्रांसफार्मरमधील हाय वोल्टेजचा 40 घरांना फटका, उसगांव साईनगरातील 'त्या' घटनेमुळे घबराट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com