Goa Taxi: डिजिटल मीटर्स न बसविणाऱ्यांसाठी...

...तर टॅक्सींचे परमिट होणार कायमचे रद्द!
Goa Taxi
Goa TaxiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील (Goa) सर्व प्रकारच्या टॅक्सींना डिजिटल मीटर्स (Goa Taxi Digital Meters) येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत बसविण्यात आले नाही तर त्यांचे परमिट कोणतीही पूर्वसूचना न देता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. तशी नोटीसही वाहतूक खात्याने जारी केली आहे. या टॅक्सीमध्ये पर्यटन, काळ्या-पिवळ्या, अखिल गोवा परमिट (Goa Permit) याचा समावेश आहे. रद्द केलेले परमिट टॅक्सी चालकांनी (taxi drivers) डिजिटल मीटर्स बसविल्याचा पुरावा सादर केल्यानंतरच पुन्हा पूर्ववत केले जाईल, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

1849 टॅक्सींचे परमिट रद्द

ज्यांचे परमिट रद्द झाले आहे व रद्द होण्याच्या प्रक्रियेत आहेत त्यातील 650 जणांनी अर्ज करून डिजिटल मीटर्स बसविण्याची हमी दिली आहे. आतापर्यंत वाहनांचा शेवटचा क्रमांक 0 व 1 असलेल्यांनी डिजिटल मीटर्स बसविले नाही त्या 1849 टॅक्सींचे परमिट रद्द झाले आहे.

Goa Taxi
Goa Taxi: स्वखर्चाने डिजिटल मीटर बसवा; नंतर सरकार देणार पैसे

मीटर्स न बसविणाऱ्यांसाठी...

ज्या टॅक्सी मालकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार डिजिटल मीटर्स बसविलेले नाहीत आणि परवाने आपोआप रद्द झाले असतील तर ते टॅक्सी व्यवसाय करू शकणार नाहीत. वाहनाचा शेवटचा क्रमांक 0 व 1 आहे व त्यांनी डिजिटल मीटर्स बसविलेले नाहीत, अशांना येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत ते बसविण्याची संधी देण्यात येईल. त्यांनी मीटर्स बसविल्यानंतर रद्द केलेले परमिट खात्याने मागे घेण्यासाठी अर्ज करावा. जोपर्यंत टॅक्सी मालक डिजिटल मीटर्स बसविल्याचा पुरावा घेऊन वाहतूक खात्याकडे अर्ज करत नाही तोपर्यंत त्याचे परमिट रद्द राहील.

Goa Taxi
Goa Taxi: राज्यातील 1849 डिजीटल टॅक्सी परवाने रद्द

वाहनाचा शेवटचा क्रमांक...

सरकारने हल्लीच दुरुस्ती अधिसूचना जारी करून डिजिटल मीटर्स टॅक्सी चालकाने बसविल्यानंतर तीन आठवड्यांत त्यांची पूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. मात्र मीटर्स बसविण्यासाठी नोंदणी करताना टॅक्सी मालकाला रक्कम जमा करावी लागणार आहे. वाहनांचा शेवटचा क्रमांक 2,3,4 व 5 असणाऱ्यांना डिजिटल मीटर्स बसविण्यासाठीची मुदत 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत तर शेवटचा क्रमांक 6,7,8 व 9 असणाऱ्यांसाठी शेवटची मुदत 31 ऑक्टोबर ही आहे. त्यानंतर ज्यांनी डिजिटल मीटर्स बसविलेले नाहीत त्यांचे परमिट रद्द होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com