Rajendra Desai Demand: सरकारच्या भूमिकेवर ऊस उत्पादक संतप्त

Rajendra Desai Demand: मागण्या मान्य न झाल्यास 6 डिसेंबरपासून आंदोलन
Sanjivani Sugar Factory |Goa News
Sanjivani Sugar Factory |Goa News Dainik Gomantak

Sanjivani Sugar Factory: सरकार आमची दिशाभूल करीत आहे. ऊस लावायचा की नाही, हे स्पष्ट सांगत नाही. आम्हाला देणे असलेली रक्कमही सरकार देत नाही, त्यामुळे संतप्त ऊस उत्पादकांनी बैठक घेऊन दयानंद नगर येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक सतेज कामत यांना भेटण्यासाठी बोलविली.

तेव्हा कामत यांनी आपण भेटू शकणार नाही, असे कळविल्याने या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या केबिनसमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच 6 डिसेंबर रोजी आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा गुरुवारी दिला.

या वेळी बैठकीला ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, पदाधिकारी हर्षद प्रभुदेसाई, गुरुदास गाड, फ्रान्सिस मास्कारेन्हस व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कृषी खात्यातर्फे पाठवून दिलेला निधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यास साखर कारखान्याचे प्रशासक टाळाटाळ करीत आहेत.

बैठकीनंतर निदर्शने

बैठकीनंतर साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. संघटनेने अगोदर कळवूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेटण्यास साखर कारखान्याचे प्रशासक सतेज कामत गैरहजर राहिल्याने शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला.

Sanjivani Sugar Factory |Goa News
Pramod Sawant Statement: जो पदासाठी पात्र असेल ; त्यालाच नोकरी मिळेल

"मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाप्रमाणे दुसऱ्या वर्षाचा नुकसान भरपाई निधी कृषी खात्यातर्फे प्रतिटन रुपये 2,800 प्रमाणे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक सतेज कामत यांच्याकडे पाठविलेला आहे. परंतु त्यांनी अद्याप तो निधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वितरित केलेला नाही. लवकरात लवकर निधी द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे."

- राजेंद्र देसाई, ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com