Leopard In Mulgao: वन विभागाच्या मोहिमेला यश; दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

गेल्या पाच दिवसात दोनवेळा हा बिबट्या पिंजऱ्यापर्यंत आला होता मात्र पिंजऱ्यात अडकला नव्हता
Leopard
LeopardDainik Gomantak
Published on
Updated on

Leopard In Goa गेले काही दिवस मुळगाव येथे दहशत माजवत असलेला बिबट्या अखेर सापळ्यात अडकला असून वन विभागाच्या मोहिमेला यश आले आहे. वन खात्याने मुळगाव येथे लावलेल्या सापळ्यात मंगळवारी (ता.15) पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास बिबट्याअडकला.

बिबट्या सापळ्यात अडकल्याची माहिती मिळताच वन खात्याच्या पथक मुळगाव येथे पहाटेच दाखल झाले. या पकडलेल्या बिबट्याची बोंडला प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. हा बिबट्या मादी जातीचा असल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली आहे.

Leopard
Goa Corona Update: हुश्श, गोवा कोरोनामुक्त राज्यात शून्य सक्रिय रूग्ण; 7 दिवसांत एकही नवा रूग्ण नाही

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिरगाव पंचायतीच्या जुन्या कार्यालयाजवळ सापळा लावण्यात आला होता. मात्र त्या तो काही अडकत नव्हता. अखेर पंचायतीजवळचा लावण्यात आलेला सापळा हटवून मुळगावात लावण्यात आला होता.

Leopard
Vijay Sardesai: शेतकऱ्यांशी चर्चा करून नव्हे, ‘एसी'त बसून कृषी धोरण ठरवले

दरम्यान मागील काही दिवसांपासून मुळगाव परिसरात या बिबट्याची दहशत वाढली असून वनविभाग बिबट्याला पकडण्याच्या मागावर होता.

साधारण दहा दिवसांपूर्वी येथील रहिवासी गौरेश परब यांच्या पाळीव कुत्र्याला पकडून हा बिबट्या पळतानाचे दृष्य सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावून ठेवला होता. साहजिकच बिबट्याच्या मानवी वस्तीलगतचा संचार वाढल्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती.

Leopard
GMCH च्या पहिल्या फेरीच्या गोवा NEET PG समुपदेशनासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

वन विभागाकडे ग्रामस्थांनी समस्या मांडल्यावर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या परिसरात पिंजरा लावून ठेवला होता. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसात दोनवेळा हा बिबट्या सापळ्यापर्यंत आला होता. मात्र तो पिंजऱ्यात अडकला नव्हता. अखेर काल मंगळवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात हा मादी बिबट्या सापळ्यापाशी आल्यावर सापळ्यात अडकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com