Goa Politics |Goa News
Goa Politics |Goa NewsDainik Gomantak

Goa Politics News: मेशू डिकॉस्तांच्या विरोधात तडीपाराची कारवाई ; कार्यकर्त्यांमध्ये खळबळ

Goa Politics News: सांगेतील कार्यकर्त्यांमध्ये संताप

Goa Politics News: सांगेचे नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांच्या विरोधात दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तडीपारीच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आज त्यांच्या समर्थकांनी सांगे येथे निदर्शने करून या कारवाईला विरोध दर्शविला.

डिकॉस्ता यांच्यावर अन्याय झाल्यास कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. यासंदर्भात नगरसेवक डिकॉस्ता यांना विचारले असता, माझा न्यायदेवतेवर विश्वास असून, सत्य काय ते सांगेतील जनतेला माहीत आहे, असे ते म्हणाले.

ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. डिकॉस्ता हे सांगेचे आमदार आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांचे कट्टर विरोधक असून मागच्या निवडणुकीत त्यांनी सावित्री कवळेकर यांच्यासाठी काम केले होते.

29 नोव्हेंबरला सुनावणी

डिकॉस्टा यांना दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी जी नोटीस पाठविली आहे, त्यात त्यांना दोन वर्षांसाठी दक्षिण गोव्यातून तडीपार का केले जाऊ नये, याची कारणे विचारली आहेत. यासंबंधीची सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार आहे.

राजकीय हेतूने कारवाई

या नोटीसीमुळे सांगेत खळबळ उडाली असून नगरसेवक डिकॉस्ता यांच्या शंभरेक समर्थकांनी आज एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या नोटीसीवर फेरविचार करण्याची मागणी केली.

Goa Politics |Goa News
P S Sreedharan Pillai: गोव्यातील आनंदाचा निर्देशांक कधी वाढणार?

ही नोटीस राजकीय हेतूने पाठविली असून अशा प्रकारची नोटीस पाठवून सामान्य लोकांचे बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखा हा प्रकार असल्याचा आरोप ऑलीवर फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत केला.

शेकडो समर्थकांची निदर्शने

नगरसेवक मेशू डिकॉस्ता हे सांगे भागात दहशत निर्माण करून शांतता बिघडविण्याचे कृत्य करीत असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षिण गोव्यातून दोन वर्षे तडीपार का करू नये, अशी नोटीस जिल्हा प्रशासनाने त्यांना बजावल्याने डिकॉस्ता यांच्या 100 पेक्षा जास्त समर्थकांनी एकत्र येऊन संताप व्यक्त केला. आज त्यांनी डिकॉस्ता यांच्या समर्थनार्थ निदर्शनेही केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com