IIT Projects At Sanguem: आयआयटीच्या कामाला तीन महिन्यांत होणार सुरवात; सांगे तालुक्यात जागा निश्चित होण्याची शक्यता

मंत्री फळदेसाईंची माहिती
Sanguem IIT
Sanguem IITDainik Gomantak
Published on
Updated on

IIT Projects At Sanguem पुढील तीन महिन्यांत आयआयटी प्रकल्पाच्या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र नेमकी जागा कुठे हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

ते म्हणाले, की सांगे तालुक्यातील रिवण गावात 10 हजार चौरस मीटर जागा पाहणीअंती योग्य असल्याचे जाणवले. या जागेची पाहणी पुढील 15 दिवसांत तज्ज्ञांकडून केली जाईल व नंतरच निर्णय घेतला जाईल.

Sanguem IIT
One Country One Election बाबत पक्षांच्या संमिश्र प्रतिक्रिया; कुणी म्हणतंय 'चांगला पर्याय' तर कुणी..

सांगेतही 4 हजार चौरस मीटरची एक जागा पाहण्यात आली होती, पण ती डोंगराळ भागात असल्याने तिचा विचार मागे पडू शकतो. जर तज्ज्ञांना दोन्ही जागा पसंत पडल्या नाहीत, तर काणकोण येथील एक जागा त्यांना दाखवली जाईल, असे मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

आयआयटीच्या उभारणीसाठी कमीत कमी ६ लाख चौरस जागेची गरज असल्याचे केंद्र सरकारला वाटते. शिवाय ही जागा रस्ते, पाणी, वीज पुरवठ्याने जोडलेला असावा. मात्र केवळ दहा हजार चौरस जागेत आयआयटी प्रकल्प कसा काय उभा राहू शकेल हा प्रश्र्न मात्र अनुत्तरित आहे.

Sanguem IIT
Indian Army Agniveer: राखीव दलात गोव्यातील अग्निवीरांना 10 टक्के जागा

सांगेत आयआयटीसाठी मंत्री आग्रही

ज्या जागेवर कोणतेही पीक काढण्यात येत नाही. जास्त झाडे तोडावी लागत नाहीत, डोंगर कापणीची गरज नाही अशाच जागेचा आयआयटीसाठी विचार केला जाईल, असेही फळदेसाई म्हणाले.

मात्र, सांगे मतदारसंघातच आयआयटीची स्थापना व्हावी यासाठी मंत्री फळदेसाई आग्रही आहेत. त्यामुळे सांगेचा विकास होईल, असे त्यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com