Goa Sand Extraction : गोव्यात वाळू माफियांचा वर्चस्ववाद टोकाला

छुपा संघर्ष : अवैध वाळू व्यवसायासाठी यापूर्वीही झाले जीवघेणे हल्ले
Illegal Sand Mining in Goa
Illegal Sand Mining in GoaDainik Gomantak

Goa Sand Extraction : सध्या गोव्यात रेती उत्खननावर बंदी आणलेल्या परिस्थितीत नदीतून काढल्या जाणाऱ्या रेतीला सोन्याचा भाव आला आहे. या पार्श्‍वभूमीवर झुआरी नदीतील रेती व्यवसायावर वर्चस्व कोणाचे राहणार या अंतर्गत संघर्षातूनच गुरुवारी एका कामगाराचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे यापूर्वी जे राडे झाले, त्याकडे पोलिसांनी डोळेझाक केल्यामुळेच माफियांची हत्या करण्यापर्यंत मजल गेल्याची स्पष्ट दिसत आहे.

बाणसाय येथील झुआरी नदीत तीन टोळ्या रेती उपशात सक्रीय असून त्यात सध्या अटकेत असलेल्या आदेल गटासह काकोडा भागातील एक गट सक्रीय आहे. तर या नदीच्या दुसऱ्या बाजूला गणेमरड शेल्डे येथील गट असे तीन गट सक्रिय आहे. यापूर्वी बाणसाय आणि काकोडा गटात यापूर्वीही दोनदा असे संघर्ष झाला होता. गुरुवारचा गोळीबार नदीच्या कुठल्या काठावरून झाला हे अजून स्पष्ट न झाल्याने या हल्ल्यात नेमका कुठल्या गटाचा हात असण्याची शक्यता आहे ते अजून समजू शकलेले नाही. जानेवारी महिन्यात याच आदेल गटाच्या एका कामगारावर असाच गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी गोळी त्या कामगाराच्या पाठीत घुसल्याने तो बालंबाल बचावला होता.

होडीतील बॅटरीचा स्फोट होऊन कामगार जखमी झाला अशी बतावणी करून प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर याच वादातून काकोडा येथील युवकावर फावड्यानी वार करून जीवघेणा हल्ला केला होता. हे दोन प्रकार होऊनसुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाही. या नदीत पूर्वीपासून बेकायेशीररित्या रेती उपसा चालू होता. मात्र, सुरवातीला येथे हे काम यांत्रिकरित्या न करता कामगार लावून केले जात होते. पण, या व्यवसायात आदेल गट सक्रिय झाल्यावर त्यांनी सक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू केला. त्यामुळे इतर दोन गट अस्वस्थ झाले होते. यातूनच यापूर्वी दोनवेळा राडे झाले, अशी माहिती आहे.

Illegal Sand Mining in Goa
Sonali Phogat Case : सोनाली फोगटसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा सांगवानचा दावा

अवैध रेतीसाठी तीन गट सक्रिय

झुआरी नदीच्या दुसऱ्या काठावर गणेमरड शेल्डे या भागातही काही लोक या अवैध धंद्यात असून ते कामगारांना लावून पूर्वी रेती काढायचे. पण आदेल गट या व्यवसायात सक्रीय झाल्यावर मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा सुरू झाल्याने या लोकांच्या धंद्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे या गटाचीही बाणसाय गटाशी दुष्मनी होती असे सांगण्यात येत आहे. या हत्येला असे तिहेरी कोन दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच लागला कामाला

युसुफ आलम (23, रा. झारखंड) याच्या थेट छातीत गोळी घुसल्याने त्याचा तत्काळ मृत्यू झाल्याचे शुक्रवारी शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. गावात रोजगार मिळत नसल्याने आपल्या पत्नी व मुलासह तसेच इतर भावंडांबरोबर युसूफ काही दिवसांपूर्वीच गोव्यात कामाला आला होता.

शिकारीच्या बंदुकीने झाडली गोळी

रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या बंदुकीनेच रेती उपसा करणाऱ्या मजुरांवर गोळी झाडली, अशी माहिती केपेचे उपअधीक्षक नीलेश राणे यांनी दिली. कुडचडे भागात अशा बंदुका कोणाकडे आहेत याचाही पोलिस तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com